नाद नाय करायचा! जडेजा अन् सिराजच्या जोडीचा कहर, 45 ओवरमध्ये विंडिंजचं सरेंडर, वाचा संपूर्ण मॅच रिपोर्ट

Last Updated:

रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे टीम इंडियाने वेस्ट इंडिजला डाव आणि 140 धावांनी पराभूत करत 1-0 अशी आघाडी घेतली.

News18
News18
अहमदाबाद: आशिया कपनंतर पुन्हा एकदा टीम इंडियाने दाखवून दिलं. भाई नाद नाही करायचा! सिराज आणि जडेजा यांच्या जोडीनं वेस्ट इंडिजला घाम फोडला अन् पाच दिवसांचा खेळ अवघ्या अडीच दिवसांत संपला. टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा डाव आणि 140 धावांनी पराभव केला.
विंडिज गारद, टीम इंडियाची आघाडी
भारताने दिवसाच्या खेळापूर्वी आपली पहिली डाव 5 विकेट्सवर 448 धावांवर घोषित करत 286 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची टीम दोन सत्रेही टिकू शकली नाही आणि दुसऱ्या डावात146 धावांवर सर्वबाद झाली. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतासाठी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात नाबाद शतक झळकावणाऱ्या जडेजाने दुसऱ्या डावात ४ बळी घेतले. त्याला मोहम्मद सिराजने साथ दिली आणि त्याने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
advertisement
मोहम्मद सिराज नाम ही काफी है! 
अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडमध्ये केलेल्या कामगिरीची आठवण करून दिली. सिराजने पहिल्या डावात फक्त ४० धावा देत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या डावात तो आणखी दमदार कामगिरी करताना दिसला. त्याने 11 ओवरमध्ये 31 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आणि या सामन्यात एकूण 8 विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या.
advertisement
सामन्यातील दुसऱ्या डावात फिरकीपटू रवींद्र जडेजानेही शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने 13 ओवरमध्ये 54 धावांच्या मोबदल्यात 4 महत्त्वपूर्ण बळी घेऊन वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या होत्या, तर कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरनेही इतर गोलंदाजांना मोलाची साथ दिली.

तीन शतकवीरांनी मिळवून दिला दमदार विजय

advertisement
भारतीय संघाच्या या दमदार Innings Victory मध्ये फलंदाजांचे योगदान निर्णायक ठरले. केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंची शतके संघासाठी महत्त्वाची ठरली. या तिघांच्या शानदार कामगिरीमुळेच भारताने 448 धावांचा डोंगर उभारत प्रतिस्पर्धी संघावर मोठी आघाडी घेतली.
भारतीय सलामीवीर केएल राहुलने 197 चेंडू खेळत 100 धावा केल्या. विशेष बाब म्हणजे, 9 वर्षांनंतर एखाद्या भारतीय सलामीवीराने भारतात कसोटी शतक झळकावले आहे. यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने 210 चेंडूंचा सामना करत 125 धावा केल्या तर अष्टपैलू रवींद्र जडेजा 104 धावांची दमदार खेळी करून नाबाद परतला. याशिवाय कर्णधार शुभमन गिलनेही अर्धशतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
नाद नाय करायचा! जडेजा अन् सिराजच्या जोडीचा कहर, 45 ओवरमध्ये विंडिंजचं सरेंडर, वाचा संपूर्ण मॅच रिपोर्ट
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement