ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन, वयाच्या 94व्या वर्षी अखेरचा श्वास

Last Updated:

Actress Sandhya Shantaram Passes Away : 'पिंजरा' या अजरामर मराठी सिनेमा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

News18
News18
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं आहे. वयाच्या 94व्या वर्षी संध्या यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री उशिरा राजकमल स्टुडिओमध्ये संध्या यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपती व्ही शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या. 'झनक झनक पायल बाजे', 'दो आंखें बारह हाथ', 'पिंजरा' हे त्यांचे प्रसिद्ध सिनेमे होते. 'पिंजरा' या कल्ट मराठी सिनेमात त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सांस्कृति मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी पोस्ट लिहित म्हटलंय, "भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !"
advertisement
संध्या शांताराम यांचा जन्म 13 सप्टेंबर 1938 साली झाला. विजय देशमुख हे त्यांचं खरं नाव. 1959-60 च्या दशकात त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलं. चित्रपती व्ही.शांताराम यांच्या प्रत्येक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. सध्या या त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या नृत्यासाठीही ओळखल्या जात होत्या. झनक झनक पायल बाजे या सिनेमात 'अरे जा हट नटखट' या गाण्यात त्यांनी प्रसिद्ध शास्त्रीय नर्तक गोपीकृष्ण महाराज यांच्याबरोबर केलेलं नृत्य सादरिकरण विशेष लोकप्रिय झालं होतं. स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा साकारून त्यांनी त्या गाण्यात नृत्य केलं. ते गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.
advertisement
संध्या यांना त्यांच्या 'पिंजरा' या सिनेमासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. चंदनाची चोळी अंग जाळी या मराठी सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन, वयाच्या 94व्या वर्षी अखेरचा श्वास
Next Article
advertisement
Supreme Court On Local Body Election : आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश...
आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व
  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

View All
advertisement