IND vs ENG : Ravindra Jadeja ची मोठी चूक, ज्याला वाचवलं त्यानेच गेम केला; 7 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
IND vs ENG : भारताविरुद्ध हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघानेही चांगली सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात जॅक क्रॉलीला बाद करून टीम इंडियाला यश मिळवून दिले, परंतु त्यानंतर भारतीय खेळाडू संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत.
IND vs ENG : भारताविरुद्ध हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघानेही चांगली सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात जॅक क्रॉलीला बाद करून टीम इंडियाला यश मिळवून दिले, परंतु त्यानंतर भारतीय खेळाडू संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत. विशेषतः रवींद्र जडेजाने सोडलेली बेन डकेटची कॅच टीम इंडियासाठी महागडा ठरला. इंग्लंडच्या डावाच्या 7 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जडेजाने बेन डकेटची कॅच सोडली.
जडेजाची चूक ठरली भारतासाठी डोकेदुखी
जसप्रीत बुमराहने जवजवळ दुसरी विकेट त्याच्या नावे केलीच होती, परंतु जडेजाने चूक केली आणि रवींद्र जडेजा ती कॅच पकडू शकला नाही. ज्यावेळेस बेन डकेटला जीवदान मिळाले तेव्हा त्याने फक्त 15 धावा केल्या होत्या, पण त्यांनतर त्याने सांभाळून फलंदाजी केली आणि इंग्लंडसाठी त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. आणि संघाचा स्कोअर 100 धावांच्या पुढे नेला. अशाप्रकारे, ज्या फलंदाजाचा कॅच रवींद्र जडेजाने सोडला तो टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला.
advertisement
भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या
हेडिंग्ले कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीला आली. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी फलंदाजीत चांगली सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी झाली. तथापि, राहुल 42 धावा करून बाद झाला, परंतु त्यानंतर यशस्वी जयस्वालने 101 धावांची खेळी केली.
यशस्वी जयस्वाल व्यतिरिक्त , कर्णधार शुभमन गिलनेही अद्भुत खेळ दाखवला. टीम इंडियासाठी शुभमन गिलने 147 धावांची दमदार खेळी केली. यासोबतच ऋषभ पंतची बॅटही खूप गाजली. पंतने भारतीय संघासाठी 134 धावा केल्या. अशाप्रकारे हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाने 471 धावा केल्या. गोलंदाजीत, बेन स्टोक्स आणि जोश टंग यांनी इंग्लंडसाठी 4-4 विकेट घेतल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 22, 2025 10:56 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : Ravindra Jadeja ची मोठी चूक, ज्याला वाचवलं त्यानेच गेम केला; 7 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?