कर्णधारपद तर दूरच आधी…, Ravindra Jadeja निशाण्यावर; कोणी मारले टोमणे?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
IND vs ENG : भारत सध्या इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला आणि भारताला ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला.
IND vs ENG : भारत सध्या इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला आणि भारताला 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या पराभवाची अनेक कारणे आहेत, ज्यात खराब क्षेत्ररक्षण, टेलएंडर्स विकेटवर न राहणे आणि बुमराह व्यतिरिक्त इतर गोलंदाजांची खराब कामगिरी यांचा समावेश आहे. पराभवानंतर यशस्वी जयस्वाल, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर सारखे खेळाडू खूप ऐकावे लागत आहेत. पण लीड्समध्ये पराभव झाल्यानंतर रवींद्र जडेजा देखील चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. याचे मोठे कारण म्हणजे इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी त्याने दिलेले त्याचे विधान. रवींद्र जडेजाने असे विधान केले होते की कसोटी सामन्यात कर्णधारपद सोपे असते, 2-3 क्षेत्ररक्षकांना इकडे तिकडे हलवावे लागते. आता टीम इंडियाच्या पराभवानंतर त्याला त्या विधानासाठी टीकेचा सामना करावा लागत आहे.
चाहत्यांनी रवींद्र जडेजावर निशाणा साधला
चाहते रवींद्र जडेजाला सतत ट्रोल करत आहेत. काही चाहत्यांनी त्याला सांगितले की कसोटीत कर्णधारपद सोपं नाही. यासोबतच त्यांनी त्याला आधी गोलंदाजी आणि फलंदाजी सुधारण्याचा सल्लाही दिला आणि नंतर अशी विधाने द्या. रवींद्र जडेजाने आर अश्विनसोबत एका पॉडकास्टमध्ये विधान केले होते की कसोटी कर्णधारपद सोपे आहे. अश्विनने त्याला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनवण्याची बाजू मांडली होती, परंतु ही जबाबदारी शुभमन गिलवर सोपवण्यात आली. गिलने कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच कसोटीत चांगली फलंदाजी केली पण शेवटी टीम इंडियाचा पराभव झाला.
advertisement
"Test captaincy is very easy, just move a fielder here & there" – said Jadeja.
Today, England chased 370+ runs, where Jadaja bowled like a part timer at nearly 4.5 economy.
Captaincy toh door ki baat hai, khud ki bowling sambhal lo pehle. 🔥 #INDvENG #Bazball #ShubmanGill pic.twitter.com/hDO5vxz8ND
— Cric Uneeb (@Cric_Uneeb) June 24, 2025
advertisement
रवींद्र जडेजाने लीड्समध्ये काय केले?
लीड्स कसोटीत रवींद्र जडेजा अपयशी ठरला. पहिल्या डावात त्याने 11 धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने नाबाद 25 धावा केल्या. मात्र, गोलंदाजीत तो संपूर्ण सामन्यात फक्त एकच बळी घेऊ शकला. त्यामुळेच चाहते त्याला ट्रोल करत आहेत. जडेजाच्या जागी कुलदीप यादवसारखा बळी घेणारा गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये असावा अशीही चर्चा आहे. बरं, आता एजबॅस्टन कसोटीत काय होते ते पाहायचे आहे. भारताने फलंदाजीमध्ये आपली छाप सोडली पण भारताची फिल्डिंग आणि गोलंदाजी या संपूर्ण सामन्यात अपयशी ठरले. आणि यानंतर आता चाहत्यांमध्ये आणि टीम व्यवस्थापनात निराशा पाहायला मिळत आहे. अशातच आता 2 तारखेपासून सुरु होणाऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजीत आणि फिल्डिंगमध्ये काय बदल होणार हे पाहणे महत्वाचे असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 25, 2025 3:16 PM IST