IND vs AUS : 'इतकंही सोपं नसेल, विराटला पुन्हा...', 2027 च्या वर्ल्ड कपवर रिकी पॉटिंगने केली मोठी भविष्यवाणी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ricky Ponting prediction On Rohit And virat : रोहित आणि कोहली पुन्हा धावा काढण्यासाठी वेळ लागेल आणि ते अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील एकदिवसीय सामन्यानंतर लगेचच होऊ शकते, असं पॉन्टिंगला वाटतं.
Ricky Ponting Prediction : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे सामने अॅडलेडमध्ये खेळला जाणार आहे. पर्थवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्यात पावसामुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. अशातच आता दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवून लाज राखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असेल. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पॉटिंग याने मोठं वक्तव्य केलं आहे.
दोन्ही खेळाडू लयीत पुन्हा येतील - रिकी पॉटिंग
रोहित आणि कोहली पुन्हा धावा काढण्यासाठी वेळ लागेल आणि ते अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील एकदिवसीय सामन्यानंतर लगेचच होऊ शकते, असं पॉन्टिंगला वाटतं. तुमची लय आणि वेग शोधणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला विश्रांती मिळते, तेव्हा 50 ओव्हरच्या खेळाच्या लय आणि वेगाची पुन्हा सवय होते, तेव्हा कोणालाही थोडा वेळ लागतो. मला आशा आहे की ते दोन्ही खेळाडू लवकरच पुन्हा खेळतील, असं रिकी पॉटिंग म्हणाला.
advertisement
2027 च्या वर्ल्ड कप संघात...
मी म्हटल्याप्रमाणे, अॅडलेड हे फलंदाजीसाठी आणि क्रिकेट खेळण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. पण ते इतकंही सोपं नसेल. पण मी नेहमीच म्हणतो, तुम्ही कधीही चॅम्पियन खेळाडूंना नाकारत नाही. आणि हे दोघेही सर्वोत्तम खेळाडूंपैकी आहेत, असंही पॉटिंग म्हणाला. विराट आणि रोहित यांना संघासाठी योगदान देण्याचा आणि सामने जिंकण्याचा मार्ग सापडेल आणि जर त्यांनी ते केले तर ते बहुधा 2027 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप संघात असतील, अशी भविष्यवाणी देखील रिकी पॉटिंगने केली आहे.
advertisement
सर्वोत्तम काळात कोचिंग
दरम्यान, भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी रोहित आणि कोहली यांच्या योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. शास्त्री यांनी या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम काळात कोचिंग दिले आहे आणि या जोडीला भारत आणि जगभरात, विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये किती सन्मान मिळतो, हे त्यांना इतरांपेक्षा जास्त माहीत आहे. माजी भारतीय कोच यांच्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलियन प्रेक्षक या दोघांचा खूप आदर करतात आणि रोहित व कोहली आपल्या कारकिर्दीला विनाकारण लांबवून आपला वारसा कमी करणार नाहीत, असंही रवी शास्त्री म्हणालेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : 'इतकंही सोपं नसेल, विराटला पुन्हा...', 2027 च्या वर्ल्ड कपवर रिकी पॉटिंगने केली मोठी भविष्यवाणी!