IND vs ENG : शुभमनचं टेन्शन मिटलं! पाचव्या दिवशी मैदानात उतरणार टीम इंडियाचा 'छावा', ड्रेसिंग रुममधून मिळाली गुड न्यूज
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sitanshu Kotak On Rishabh Pant injury : मँचेस्टर येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत दुखापतग्रस्त असूनही पाचव्या दिवशी बॅटिंगसाठी उतरणार असल्याची माहिती टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी दिली आहे.
IND vs ENG 4th test : मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया (Team India) सध्या अवघडलेल्या परिस्थितीत आहे. शुन्यावर दोन गडी बाद झाल्यानंतर टीम इंडिया संकटात सापडली होती. त्यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी विकेट्सपुढे भिंत रोवली आणि एकही विकेट जाऊन न देता संपूर्ण दोन सेशन्स खेळून काढले. अशातच आता पाचव्या दिवसाचे पहिले तीन तास टीम इंडियासाठी महत्त्वाचे असतील. त्यातच टीम इंडियाला गुड न्यूज मिळाली आहे.
पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर
दुखापत असूनही ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी फलंदाजी करत अर्धशतक झळकावून आपली झुंजारवृत्ती दाखवून दिली होती. आता तो पाचव्या दिवशी मैदानात उतरणार आहे. ऋषभ बॅटिंग करणार असल्याने भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. इंग्लंडने दिलेल्या मोठ्या आघाडीसमोर सामना वाचवण्यासाठी पंतची बॅटिंग अत्यंत महत्त्वाची ठरणार होती. बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी चौथ्या दिवस अखेर माहिती दिली.
advertisement
कोच सितांशु कोटक काय म्हणाले?
राहुलची टेकनिक खूप वेगळी असते. त्यामुळेच तो खास प्लेयर आहे. इतर खेळाडूंना राहुलसारखं जमत नाही. त्यामुळेच तो टीम इंडियाचा आधार आहे, असं सितांशु कोटक यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी ऋषभ पंतच्या खेळण्यावर देखील मोठी अपडेट दिली.
advertisement
ऋषभ पंत पाचव्या दिवशी खेळणार
ऋषभ पंत चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया संकटात असताना खेळणार का? असा सवाल विचारला गेला. त्यावर सितांशु कोटक यांनी सकारात्मक उत्तर दिलं. मला वाटतं की ऋषभ पंत पाचव्या दिवशी मैदानात उतरेल, अशी माहिती बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान, पहिल्याच दिवशी रिव्हर्स स्वीप खेळताना पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते, त्यामुळे तो या सामन्यात विकेटकिपिंग करू शकणार नव्हता. त्याच्याऐवजी ध्रुव जुरेलने विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 27, 2025 7:54 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : शुभमनचं टेन्शन मिटलं! पाचव्या दिवशी मैदानात उतरणार टीम इंडियाचा 'छावा', ड्रेसिंग रुममधून मिळाली गुड न्यूज


