277 रनची वादळी खेळी, 25 फोर 15 सिक्स, रोहितचा महारेकॉर्ड उद्ध्वस्त, टीम इंडियाच्या एन्ट्रीपासून आता कोण रोखणार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वनडे क्रिकेटमध्ये जेव्हा रेकॉर्डबद्दल बोललं जातं, तेव्हा क्रिकेट रसिकांना रोहित शर्माने केलेल्या 264 रनचा विक्रम आठवतो. रोहित शर्माचा हा विक्रम मागची बरीच वर्ष तुटला नव्हता.
मुंबई : वनडे क्रिकेटमध्ये जेव्हा रेकॉर्डबद्दल बोललं जातं, तेव्हा क्रिकेट रसिकांना रोहित शर्माने केलेल्या 264 रनचा विक्रम आठवतो. रोहित शर्माचा हा विक्रम मागची बरीच वर्ष तुटला नव्हता, पण आता एका भारतीय खेळाडूनेच हा विश्वविक्रम मोडून इतिहास घडवला आहे. तामिळनाडूचा बॅटर नारायण जगदीशनने हा रेकॉर्ड केला आहे. जगदीशनने स्थानिक वनडे सामन्यात धमाका केला आहे.
277 रनची वादळी खेळी
जगदीशनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये फक्त 141 बॉलमध्ये 277 रनची वादळी खेळी केली, यात त्याने 25 फोर आणि 15 सिक्स मारले, म्हणजेच जगदीशनने प्रत्येक ओव्हरमध्ये एक बाऊंड्री लगावली आहे. या धमाकेदार खेळीने जगदीशनने रोहित शर्माचं 264 रनचं रेकॉर्डही मोडलं आहे. जगदीशनने हा विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला नसला, तरी एवढा मोठा स्कोअर केल्यामुळे जगदीशन चर्चेत आला आहे.
advertisement
तामिळनाडूने केले 506 रन
या सामन्यात तामिळनाडूने तब्बल 506 रन केले, जो भारतीय स्थानिक क्रिकेट इतिहासातला विक्रम आहे. जगदीशनशिवाय साई सुदर्शनेही या सामन्यात 154 रनची खेळी केली, या दोघांमध्ये तब्बल 416 रनची पार्टनरशीप झाली, ज्यामुळे तामिळनाडू क्रिकेटचं नाव इतिहासाच्या पानांमध्ये लिहिलं गेलं आहे.
जगदीशनने ठोठावले टीम इंडियाचे दरवाजे
जगदीशन स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जगदीशनने स्वत:ला सिद्ध करून निवड समितीला प्रभावित केलं आहे. या कामगिरीनंतर जगदीशनला भारताच्या टेस्ट टीममध्ये सामील करण्यात आलं, पण त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली नाही.
advertisement
जगदीशनचं तंत्र, संयम आणि आक्रमकता यांचं मिश्रण त्याला भविष्यातला स्टार बनवू शकतं. त्याची लवकरच टीम इंडियात निवड होईल, असा विश्वास क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मोठ्या सामन्यांमध्ये संधी मिळाली, तर जगदीशन तिथेही असाच धमाका करेल, असा विश्वास भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Chennai,Tamil Nadu
First Published :
October 21, 2025 6:30 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
277 रनची वादळी खेळी, 25 फोर 15 सिक्स, रोहितचा महारेकॉर्ड उद्ध्वस्त, टीम इंडियाच्या एन्ट्रीपासून आता कोण रोखणार?