दत्ता भरणे सोडून गेला तरी दादांना फरक पडणार नाही, जाणाऱ्यांना इशारा देताना डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

Last Updated:

Solapur Politics: सोलापुरात राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असताना राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

दत्ता भरणे (कृषिमंत्री)
दत्ता भरणे (कृषिमंत्री)
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याच्या हालचालीनंतर आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी टेंभुर्णी येथे एक बैठक घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. इंदापूरमधून दत्तात्रय भरणे जरी अजितदादांना सोडून गेले तरी त्यांना काही फरक पडणार नाही, अशा शब्दात पक्ष सोडू इच्छिणाऱ्या नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिलाय.
सोलापुरात राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असताना राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापुरात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
कुणी सोडून जात असतील तर त्यांची समजूत काढणे गरजेचे आहे आणि यासाठीच जे नाराज नेते पक्ष सोडायच्या तयारीत आहेत. त्यांची आपण भेट घेऊन समजूत घालणार, अशी भूमिका आज दत्तात्रय भरणे यांनी मांडली. पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी अद्याप पक्ष सोडण्याबाबत जाहीर वक्तव्य केलेले नाही. जे नाराज आहेत त्यांची कारणे ही छोटीशी किंवा गैरसमजातून पुढे आलेली असतील. मात्र आपण त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करू, असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.
advertisement
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे आणि माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचा गट भारतीय जनता पक्षात पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
याच संदर्भात सर्वच इच्छुक प्रवेशकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी आलेल्या कृषिमंत्र्यांनी आपण केवळ संवादासाठी आलो आहोत. डॅमेज कंट्रोलसाठी नाही, असा खुलासा केला. मात्र नाराजांची भेट घेऊन समजूत घालणार असे सांगताना हा सर्व प्रकार केवळ डॅमेज कंट्रोलसाठी आणि पुढील गळती रोखण्यासाठी असल्याचे उघड झाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दत्ता भरणे सोडून गेला तरी दादांना फरक पडणार नाही, जाणाऱ्यांना इशारा देताना डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement