Ind vs Aus: रोहित शर्माचे कसोटी करिअर संपले; एक नव्हे तिघांनी दिला दुजोरा, तो पुन्हा दिसणार नाही

Last Updated:

Rohit Sharma Test career: भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीतून माघार घेतली. त्याच्या या निर्णयानंतर भारताच्या माजी कर्णधार सुनिल गावस्करांसह अन्य माजी क्रिकेटपटूंनी मोठे वक्तव्य केले आहे.

News18
News18
सिडनी: भारताचा कर्णधार रोहित शर्माची 67 सामन्यांची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. रोहितने त्याच्या कारकिर्दीबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही, परंतु माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर या तिघांनी असे म्हटले आहे की, बॉक्सिंग डे कसोटी सामना रोहित शर्माचा कदाचित शेवटचा कसोटी सामना असेल. रोहित आता भारताकडून कसोटी सामने खेळताना दिसणार नाही, असे या तिघांनी ठामपणे म्हटले आहे.
रोहित शर्माच्या निर्णयावर दिग्गज म्हणाले...
37 वर्षीय रोहित शर्माने सिडनीत खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटीत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या पाच डावात रोहितला फक्त 31 धावा करता आल्या. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान लंच ब्रेक दरम्यान सुनील गावस्कर म्हणाले, याचा अर्थ असा आहे की जर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र ठरला नाही तर मेलबर्न टेस्ट ही रोहितची शेवटची टेस्ट असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील हंगाम इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून सुरू होईल आणि निवड समितीला असा खेळाडू हवा आहे जो 2027च्या WTCची फायनल खेळेल. भारत तिथे पोहोचेल की नाही हा नंतरचा विषय आहे. पण हा निवड समितीचा विचार असेल. असे झालेच तर आपण सर्वांनी रोहित शर्माला शेवटची कसोटी खेळताना पाहिले आहे.
advertisement
१ जानेवारीला आपण नवीन वर्ष का साजरे करतो? या देशात ५ वेळा साजरा होतो नववर्ष
समालोचन करताना रोहित शर्माबाबत रवी शास्त्री म्हणाले, मी टॉसच्या वेळी विचारण्याआधीच जसप्रीत बुमराह म्हणाला होता की कर्णधाराने बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि शुबमन गिलच्या खेळाने संघ मजबूत होईल. जेव्हा तुम्ही धावा काढत नसाल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही तिथे नसता तेव्हा असे घडते. त्याने या सामन्यातून बाहेर राहण्याचे मान्य केले हा कर्णधाराचा अत्यंत धाडसी निर्णय आहे.
advertisement
17व्या वर्षी मुंबईच्या आयुष म्हात्रेने क्रिकेटमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड
तर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहितच्या निर्णयाचे कौतुक करताना सांगितले की, हा रोहित शर्माचा निर्णय आहे. संघासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. पण या प्रकरणाभोवतीचे गूढ समजले नाही. नाणेफेकीच्या वेळीही यावर चर्चा झाली नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ind vs Aus: रोहित शर्माचे कसोटी करिअर संपले; एक नव्हे तिघांनी दिला दुजोरा, तो पुन्हा दिसणार नाही
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement