Rohit Sharma : सराव सामन्यातून डावललं आता पुढे काय होणार? रोहितबाबत मोठी अपडेट समोर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात सराव सामने खेळवले जाणार आहेत.या सराव सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसतील, अशी चर्चा होती. मात्र दोघांना या संघात स्थान देण्यात आलं नाही
Rohit Sharma News : आशिया कप स्पर्धेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दोऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात सराव सामने खेळवले जाणार आहेत.या सराव सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसतील, अशी चर्चा होती. मात्र दोघांना या संघात स्थान देण्यात आलं नाही.त्यामुळे उलट सुलट चर्चांना वेग आला होता.अशात आता रोहित शर्मा पुढे काय करणार आहे? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
खरं तर भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात दोन सराव टेस्ट सामने खेळवले जाणार आहेत. यातील एका टेस्टला आजपासून सूरूवात झाली आहे.या टेस्टसोबत तीन वनडेचे सराव सामने देखील खेळवले जाणार आहेत.त्यामुळे या वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली जागा मिळेल अशी चर्चा होती.पण दोघांना संघात स्थान मिळालं नाही आहे.त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
advertisement
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने नुकतीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिटनेस टेस्ट पास केली होती.त्यानंतर या दोन्ही खेळाडूंना वनडेच्या सराव सामन्यात संधी मिळेल अशी चर्चा होती. पण या दोन्ही खेळाडूंच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.त्यामुळे आता रोहित आणि विराट कोहली पुढे काय करणार? असा सवाल उपस्थित होत होता.अखेर यावर मोठी अपडेट समोर आली आहे.
advertisement
रेव्हस्पोर्टसच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे मालिकेच्या तयारीसाठी रोहित शर्मा बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये सराव करणार आहे. यावेळी सरावासाठी रोहित शर्माने उसळत्या विकेटसाठी विनंती केली होती.त्यानुसार त्याने आज जवळजवळ एक तास सराव केला आहे. त्यामुळे जरी रोहित शर्मा सराव सामन्यात खेळत नसला तरी तो ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे सामन्यात खेळेल असे बोलले जात आहे.
advertisement
मी पुन्हा येत आहे...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅचमध्ये परतण्यासाठी रोहित शर्माने तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्टमध्ये रोहित वनडेतून निवृत्त होणार असल्याचं म्हटलं होतं, पण आता रोहितनेच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तो म्हणतो, 'मी पुन्हा येत आहे. मला इथं चांगलं वाटत आहे.'
advertisement
दरम्यान, रोहितची वनडे क्रिकेटमध्ये ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन मॅचच्या वनडे सीरिजमधून वापसी होऊ शकते. त्याने भारतासाठी शेवटची मॅच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळली होती आणि त्याच्या नेतृत्वाखाली टीमने विजेतेपद पटकावलं होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये रोहितने 76 रन्स केले होते. या कामगिरीबद्दल त्याला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं होतं.
पहिल्या वनडेसाठी भारत अ संघ:
रजत पाटीदार (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकिपर), प्रियांश आर्य, सिमरजीत सिंग.
advertisement
दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी भारत अ संघ:
तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), रियान पराग, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक सिंह, अभिषेक पोरेल
ऑस्ट्रेलिया अ संघाचा भारत दौरा :-
16-19 सप्टेंबर: पहिला चार दिवसांचा सामना, एकाना स्टेडियम, लखनऊ
advertisement
22-26 सप्टेंबर: दुसरा चार दिवसांचा सामना, एकाना स्टेडियम, लखनऊ
30 सप्टेंबर: पहिला एकदिवसीय सामना, ग्रीन पार्क, कानपूर
3 ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, ग्रीन पार्क, कानपूर
5 ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, ग्रीन पार्क, कानपूर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 5:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : सराव सामन्यातून डावललं आता पुढे काय होणार? रोहितबाबत मोठी अपडेट समोर