सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच शेअर केला सुनेसोबतचा Photo, सारा-अंजलीही सोबत!

Last Updated:

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच त्याची होणारी सून सानिया चांडोकसोबतचा फोटो शेअर केला आहे.

सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच शेअर केला सुनेसोबतचा Photo, सारा-अंजलीही सोबत!
सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच शेअर केला सुनेसोबतचा Photo, सारा-अंजलीही सोबत!
मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच त्याची होणारी सून सानिया चांडोकसोबतचा फोटो शेअर केला आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा काहीच दिवसांपूर्वी झाल्याचं वृत्त आहे, मात्र त्याच्या साखरपुड्याचा फोटो अजून समोर आलेला नाही, तसंच तेंडुलकर आणि चांडोक कुटुंबापैकी कुणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
अर्जुनची होणारी पत्नी सानिया चांडोक ही सचिनची मुलगी सारा तेंडुलकरच्या अकादमीच्या एका कार्यक्रमात दिसली आहे. सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर देखील त्यांच्यासोबत आहे. सचिनने पहिल्यांदाच त्याच्या सोशल मीडिया हँडलवर त्याच्या सुनेसोबतचा फोटो शेअर केला आहे.



 










View this post on Instagram























 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)



advertisement

सून सानियाचा सचिनसोबतचा फोटो

सचिन तेंडुलकरची मुलगी साराने मुंबईत पिलेट्स अकादमी उघडली आहे. फिजिकल आणि मेंटल फिटनेस वाढवण्यासाठी ही अकादमी मदत करणार आहे. मूळच्या दुबईच्या असलेल्या या कंपनीने मुंबईमध्ये चौथी फ्रँचायझी उघडली आहे. या कार्यक्रमाला अंजली तेंडुलकरची आई अॅनाबेल मेहता यादेखील उपस्थित होत्या. सचिनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, साराची मेहुणी सानिया चांडोकने लक्ष वेधून घेतले आहे. सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच कौटुंबिक कार्यक्रमात सानियासोबतचे फोटो अपलोड केले आहेत.
advertisement

सचिनने केलं साराचं कौतुक

'तुमच्या मुलांनी त्यांना जे आवडतं ते साध्य करावं, असंच तुम्हाला पालक म्हणून वाटतं. साराचं पिलेट्स स्टुडिओ उघडणे, हा त्यापैकीच एक क्षण आहे. साराने तिच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने हा टप्पा गाठला आहे', असं सचिन तेंडुलकर त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच शेअर केला सुनेसोबतचा Photo, सारा-अंजलीही सोबत!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement