Shikhar Dhawan Divorce : शिखर धवन आणि पत्नी आयेशा मुखर्जीचा घटस्फोट न्यायालयाकडून मंजूर
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने बुधवारी धवन आणि आयेशाच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.
मुंबई, 4 ऑक्टोबर : भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी अखेर विभक्त झाले आहेत. दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने बुधवारी धवन आणि आयेशाच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. न्यायाधीश हरीश कुमार यांनी धवनने आपल्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाच्या अर्जात केलेले सर्व आरोप या आधारावर मान्य केले की पत्नी आयशा मुखर्जी स्वतःचा बचाव करण्यात अपयशी ठरली.
भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवनने 2012 रोजी आयेशा मुखर्जी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आयेशा मुखर्जी ही किक बॉक्सर असून मूळ ऑस्ट्रेलियाची नागरिक आहे. आयेशा मुखर्जीचा यापूर्वी देखील एक घटस्फोट झाला असून यातून तिला २ मुली आहेत. तर लग्नानंतर आयेशा आणि शिखर धवनने नोव्हेंबर 2014 मध्ये मुलाला जन्म दिला ज्याचे नाव झोरावर ठेवण्यात आले. मागील अनेक महिन्यांपासून शिखर आणि आयेशामध्ये सर्व काही ठीक नसल्याचे बोलले जात होते. त्यानंतर शिखर धवन आणि पत्नी आयेशा मुखर्जीने दिल्ली न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती.
advertisement
दाम्पत्याच्या मुलाच्या कायमस्वरूपी ताब्यात घेण्याबाबत कोणताही आदेश देण्यास नकार देताना, न्यायालयाने धवनला आपल्या मुलाला भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये योग्य कालावधीसाठी भेटण्यासाठी आणि व्हिडिओ कॉलवर त्याच्याशी चॅट करण्याचे अधिकार दिले आहेत. न्यायालयाने आयशाला पुढे शैक्षणिक दिनदर्शिकेदरम्यान शाळेच्या सुट्टीच्या अर्ध्या कालावधीसाठी धवन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह मुक्काम करण्यासह मुलाला भेटीसाठी भारतात आणण्याचे आदेश दिले. धवनच्या याचिकेनुसार, पत्नीने सुरुवातीला ती त्याच्यासोबत भारतात राहणार असल्याचे सांगितले होते. परंतु आयेशा ही तिच्या पूर्व पतीशी असलेल्या वचनबद्धतेमुळे ती असे करण्यात अयशस्वी ठरली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2023 9:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shikhar Dhawan Divorce : शिखर धवन आणि पत्नी आयेशा मुखर्जीचा घटस्फोट न्यायालयाकडून मंजूर