MI vs PBKS : 'पिच्चर अभि बाकी है...', मुंबईचा गेम केल्यानंतर श्रेयसची RCB ला वॉर्निंग, पंजाब किंग्ज बदला घेणार?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shreyas Iyer Statement Before IPL Final : पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यर याने मुंबई इंडियन्सविरुद्ध अफलातून खेळी केली. अशातच मॅच झाल्यानंतर अय्यरने आरसीबीला टेन्शन दिलं आहे.
Shreyas Iyer warning to RCB : आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान निश्चित केल्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वाखालील कामगिरीचे आणि संघाच्या यशाचे रहस्य उलगडलं. मोठ्या दबावाखाली शांत राहण्याच्या त्याच्या क्षमतेवर आणि संघाच्या सकारात्मक दृष्टिकोनावर श्रेयसने भर दिला. तसेच श्रेयसने सामन्यानंतर (Shreyas Iyer Statement) बोलताना असं काही वक्तव्य केलं की, आरसीबीच्या हृदयाचे ठोके चुकले आहेत.
नेमकं काय म्हणाला श्रेयस अय्यर?
श्रेयस अय्यरने आपल्या फलंदाजीदरम्यान शांत राहण्याबद्दल बोलताना सांगितलं की, "खरं सांगायचं तर मला माहीत नाही, पण मला असे मोठे प्रसंग खूप आवडतात." तो नेहमी स्वतःला आणि आपल्या सहकाऱ्यांना सांगतो की, प्रसंग जेवढा मोठा असतो, तेवढे तुम्ही शांत राहिल्यास मोठे निकाल मिळतात. "आज हे त्याचेच एक योग्य उदाहरण होते, जिथं मी जास्त घाम गाळण्याऐवजी माझ्या श्वासोच्छ्वासावर अधिक लक्ष केंद्रित करत होतो," असे अय्यर म्हणाला. मोठ्या दबावाखाली शांत राहून आपल्या नैसर्गिक खेळावर लक्ष केंद्रित केल्यामुळेच त्याला हे यश मिळाल्याचे अय्यरने सांगितलं.
advertisement
जॉब इज नॉट डन - श्रेयस अय्यर
सामन्यापूर्वीच मी म्हटलं होतं की, सर्व खेळाडूंनी आक्रमक असावं आणि पहिल्या चेंडूपासूनच त्यांची नीती स्पष्ट दिसावी. माझ्यासाठीही, मला थोडा वेळ घ्यावा लागला. दुसऱ्या टोकाकडून फलंदाज चांगली फलंदाजी करत होते. मला माहीत आहे की, मी मैदानावर जास्त वेळ घालवला, तर मी अधिक चांगला खेळू शकेन आणि माझी दृष्टीही अधिक स्पष्ट होईल, असंही अय्यर म्हणाला. तसेच अजून काम पूर्ण झालं नाही, असं म्हणत पिच्चर अभि बाकी है अशा इशारा देत अय्यरने आरसीबीला वॉर्निंग दिली आहे.
advertisement
श्रेयसची धमाकेदार खेळी
दरम्यान, गेल्या वर्षभरात श्रेयस अय्यरने क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहेत. आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबई इंडियन्सविरुद्ध एका अविस्मरणीय खेळीने आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. त्याने या निर्णायक सामन्यात केवळ 41 चेंडूंमध्ये नाबाद 87 धावांची वादळी खेळी केली.
advertisement
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रीस टोपली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 02, 2025 10:25 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs PBKS : 'पिच्चर अभि बाकी है...', मुंबईचा गेम केल्यानंतर श्रेयसची RCB ला वॉर्निंग, पंजाब किंग्ज बदला घेणार?