IND vs ENG : Shubhman-Jadeja चा 'आंखों ही आंखों में इशारा', नजरेला नजर भिडली अन्…; व्हिडिओ व्हायरल

Last Updated:

IND vs ENG 2nd Test : बर्मिंगहॅममध्ये जलद धाव घेतल्यानंतर शुभमन गिलने रवींद्र जडेजाचे कौतुक केले. फक्त एक इशारा आणि जडेजाची शुभमनला मिळाली साथ. यानंतर स्टंपमाइकमध्ये त्यांचं बोलणं रेकॉर्ड झालं ज्यामुळे हा विडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

News18
News18
IND vs ENG 2nd Test : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघ आरामदायी स्थितीत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यास भाग पाडलेल्या टीम इंडियाची एजबॅस्टन येथे चांगली सुरुवात झाली नाही. सलामीवीर केएल राहुल केवळ दोन धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. परंतु त्यानंतर, करुण नायर (31) आणि यशस्वी जयस्वाल (87) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 80 धावांची महत्त्वाची अर्धशतकी भागीदारी केली. ज्यामुळे भारतीय संघ सुरुवातीच्या धक्क्यातून सावरला. तथापि, यानंतर, काही अंतराने संघाला एकामागून एक आणखी चार धक्के सहन करावे लागले. त्यानंतर लोकांच्या चिंता वाढल्या. परंतु शेवटच्या क्षणी, कर्णधार शुभमन गिल (नाबाद 114) आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा (नाबाद 41) यांनी सहाव्या विकेटसाठी 99 धावांची नाबाद भागीदारी करून सर्वांना दिलासा दिला.
शुभमन आणि जडेजाचा व्हिडिओ व्हायरल
बर्मिंगहॅम येथे सुरु भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या कसोटी मालिकेचा पहिला सामना इंग्लंडने 5 विकेट्सने जिंकला आणि या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसऱ्या सामन्याचा पहिला डाव २ जुलैला खेळला गेला. ज्यात भारताने 310/5 असा स्कोर केला आहे. या दरम्यान, सामन्यात अनेक गोष्टी घडल्या त्यातच एक विडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान, जेव्हा शुभमन आणि जडेजा हे दोन्ही खेळाडू फलंदाजी करत होते, तेव्हा त्यांच्यात काही मनोरंजक गोष्टी घडल्या. ज्याचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्स इंडियाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शुभमन गिलला 'आँखों ही आँखों मे हाहा! मी तुमच्यासोबत आहे' असे म्हणताना ऐकू येते.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Star Sports India (@starsportsindia)



advertisement
गिलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सातवे शतक पूर्ण केले
बर्मिंगहॅममध्ये शानदार फलंदाजी करताना शुभमन गिलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे कसोटी शतक पूर्ण केले आहे. पहिल्या दिवशी खेळ संपेपर्यंत तो 52.77 च्या स्ट्राईक रेटने 216 चेंडूत 114 धावा करून नाबाद आहे. दरम्यान, त्याच्या बॅटमधून 12 चौकार निघाले आहेत. दुसऱ्या दिवशी तो या खेळीला जास्त वेळ देईल अशी चाहत्यांना आशा आहे.
advertisement
जडेजा त्याच्या 23 व्या अर्धशतकाच्या जवळ आहे
पहिल्या दिवसाअखेर रवींद्र जडेजा 61.99 च्या स्ट्राईक रेटने 67 चेंडूत 41 धावा करून नाबाद आहे. दरम्यान, त्याच्या बॅटवरून पाच चौकार निघाले आहेत. जर तो दुसऱ्या दिवशी आणखी नऊ धावा करू शकला तर तो त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 23 वे अर्धशतक पूर्ण करेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : Shubhman-Jadeja चा 'आंखों ही आंखों में इशारा', नजरेला नजर भिडली अन्…; व्हिडिओ व्हायरल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement