Asia Cup : दोनच जागा अन् 4 खेळाडूंमध्ये फाईट, BCCI समोर मोठं टेन्शन! शुभमन गिलचा सिलेक्टर्सला 'तो' इशारा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shubhman Gill Warn Selectors Amid Asia Cup : 2023 च्या आयपीएलमध्ये त्याने 890 धावा केल्या होत्या आणि जर निवडकर्ते याकडे दुर्लक्ष करणार असतील, तर त्यांना शुभेच्छा, असे शुभमन गिल म्हणाला होता.
Indian Cricket team for Asia Cup 2025 : पुढील पंधरवड्यात संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणाऱ्या आगामी आशिया कपसाठी टी-20 संघाची निवड करणार आहेत. या संघात सूर्यकुमार यादव कर्णधार असल्यामुळे शुभमन गिलच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आशिया कपपेक्षाही जास्त, निवडकर्ते देशातच फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप आणि त्यानंतरच्या काळासाठी एक मोठी योजना तयार करण्याच्या विचारात आहेत. अशातच आता शुभमन गिलने मोठं वक्तव्य केलंय.
जर निवडकर्ते दुर्लक्ष करणार असतील तर...
शुभमन गिलने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप संघनिवडीपूर्वी निवडकर्त्यांना एक प्रकारे आठवण करून दिली होती. 2023 च्या आयपीएलमध्ये त्याने 890 धावा केल्या होत्या आणि जर निवडकर्ते याकडे दुर्लक्ष करणार असतील, तर त्यांना शुभेच्छा, असे शुभमन गिल म्हणाला होता. त्यामुळे आता शुभमन गिलचं टी-ट्वेंटीमध्ये कमबॅक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यावर वृत्त दिलं आहे.
advertisement
एकदिवसीय संघाचा उपकर्णधार
यावेळी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की गिल हा सध्या एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर लगेचच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात त्याला टी-20 संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आले होते. शुभमन गिलला टी-20 विश्वचषकात संधी मिळाली नाही. त्यानंतर अक्षर पटेल याला व्हाईस कॅप्टन बनवण्यात आलं होतं. अशातच आता शुभमन गिलला संघात जागाच नाही तर व्हाईस कॅप्टन्सी देखील हवी आहे.
advertisement
दोन जागा चार खेळाडू
एकीकडे शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी देखील आपली क्षमता दाखवून दिल्याने त्यांची जागा देखील फिक्स आहे. अशातच आता दोन सलामीवीरांच्या जागेसाठी चार पर्याय तयार झाले आहेत. त्यामुळे आता नेमकी संधी कुणाला मिळणार? असा सवाल विचारला जातोय. बीसीसीआयसमोर देखील मोठा पेच निर्माण झाला आहे.
advertisement
बीसीसीआयसमोर पेच
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. गिलची एक प्रमुख फलंदाज म्हणून झालेली प्रगती आणि इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाची प्रभावी कामगिरी, हे दोन्ही एकाच वेळी घडले आहे. तरीही, भारतीय टी-20 संघात केवळ टी-20 स्पेशलिस्ट खेळाडू असावेत की सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना संधी द्यावी, यावर अजूनही चर्चा सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 13, 2025 1:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : दोनच जागा अन् 4 खेळाडूंमध्ये फाईट, BCCI समोर मोठं टेन्शन! शुभमन गिलचा सिलेक्टर्सला 'तो' इशारा