IND vs AUS: रोहितला ODIच्या कर्णधारपदावरून हटवले, नवा कॅप्टन शुभमन गिल; सरपंच अय्यरला दिली मोठी जबाबदारी

Last Updated:

Shubman Gill India New ODI captain: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने वनडे संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड केली आहे. तो रोहित शर्माची जागा घेईल.

News18
News18
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुभमन गिल याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे तो रोहित शर्माच्या जागी भारताचा नवा वनडे कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. विशेष म्हणजे ही गिलची वनडे संघाचे नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ असेल. याआधी त्याने टेस्ट आणि टी२० संघांचे नेतृत्व केलेले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर (वनडे)
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी 20 संघ जाहीर
advertisement
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार असून त्यानंतर पाच सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. सुमारे सात महिन्यांनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघात परतले आहेत. या दोघांनी शेवटचा सामना फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळला होता. तेव्हा त्यांनी भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले होते. आता मात्र दोघेही फक्त वनडे स्वरूपात खेळणार आहेत, कारण त्यांनी टेस्ट आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 
advertisement
गिल नवा कर्णधार
शुभमन गिलला वनडे संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. याआधी गिलने रोहितकडून टेस्ट संघाचं नेतृत्व  घेतलं होतं. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं गेलं असून श्रेयस अय्यरला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
वनडे मालिकेचे वेळापत्रक
advertisement
पहिला वनडे : १९ ऑक्टोबर पर्थ
दुसरा वनडे : २३ ऑक्टोबर अॅडलेड
तिसरा वनडे : २५ ऑक्टोबर सिडनी
प्रमुख बदल 
-जसप्रीत बुमराहला वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. मात्र टी२० मालिकेत तो खेळणार आहे.
advertisement
-हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत दुखापतीमुळे या दौऱ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS: रोहितला ODIच्या कर्णधारपदावरून हटवले, नवा कॅप्टन शुभमन गिल; सरपंच अय्यरला दिली मोठी जबाबदारी
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement