'मैं एक जवान लडका, तू हसीन लडकी...', इंदौरच्या होणाऱ्या सुनबाईला लागली हळद! पलाशचा मन जिंकणारा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Smriti Mandhana haldi ceremony : टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिच्या हळदी संमारंभाचा व्हिडीओ समोर आला आहे. यात दोन्ही कपल दिसतायेत.
Smriti Mandhana Palash muchhal haldi Video : टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा हळदी समारंभ पार पडला. या समारंभाला कुटुंब, मित्र आणि मानधनाचे क्रिकेट संघातील खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रम स्थळ पिवळ्या रंगाने सजवण्यात आले होते आणि समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चमकदार पिवळ्या रंगाच्या पोशाखात, स्मृती तिच्या जवळच्या मैत्रिणींसोबत नाचताना आणि हसताना दिसत आहे.
दोघांनी एकमेकांची मन जिंकली
स्मृती मानधानाच्या मंगेतरानेही चमकदार पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते. त्यांच्यासोबत ढोल आणि झांजा होत्या. हळदी समारंभासाठी, स्मृतीने बॉर्डर असलेला पिवळा कुर्ता घातला होता. तो शरारा सूटसारखा दिसत होता, पलाझोवर सोनेरी बुटी सजवलेल्या होत्या. यावेळी दोघांनी एकमेकांची मन जिंकली. डोक्याला लागलेली हळद एकमेकांच्या डोक्यावरून काढली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
advertisement
advertisement
पोरींनी ठुमके लगावले अन्
एक जवान लडका एक जवान लडकी या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमातील गाण्यावर करवले आणि करवल्या भन्नाट नाचल्या. तर टीम इंडियाच्या पोरींनी देखील आपले जलवे दाखवले. श्रेयांका पाटीलसह अनेक पोरींनी ठुमके लगावले अन् कार्यक्रमात जीव आणला. तसेच आता येत्या 23 तारखेला दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत.
advertisement
पलाश मुच्छलने केलं प्रपोज
दरम्यान, हळदी समारंभाच्या आधी पलाश मुच्छलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो डीवाय पाटील येथे मंधानाला प्रपोज करताना दिसत होता. त्यावर स्मृती त्याला हा म्हटली होती. आता दोघंही सातजन्माच्या गाठी बांधण्यासाठी तयार झाले आहेत.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
November 22, 2025 10:47 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'मैं एक जवान लडका, तू हसीन लडकी...', इंदौरच्या होणाऱ्या सुनबाईला लागली हळद! पलाशचा मन जिंकणारा Video


