Suryakumar Yadav : 'वनडे कॅप्टन्सीसाठी मी प्रयत्न करेन...', सूर्या टी-20 ची कॅप्टन्सी गमावणार? म्हणाला 'सगळ्यांना भीती वाटते...'

Last Updated:

Suryakumar Yadav On Shubhman Gill : मी खोटं बोलणार नाही, प्रत्येकाला ही भीती असते. पण ही भीती तुम्हाला प्रेरित करते, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.

Suryakumar Yadav On T20I Captaincy
Suryakumar Yadav On T20I Captaincy
Suryakumar Yadav On T20I Captaincy : बीसीसीआयच्या धक्कातंत्राने अनेक एक्सपर्ट्सची बोलती बंद केल्याचं अनेकदा पहायला मिळालं आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये शुभमन गिलला कॅप्टन्सी देऊन बीसीसीआयने सर्वांना चकित केलं होतं. अशातच आता सूर्यकुमार यादवने मोठं वक्तव्य केलं आहे. सूर्यकुमार यादवला टी-ट्वेंटीची कॅप्टन्सी गमवण्याची भीती वाटत आहे. एका कार्यक्रमात बोलताना सूर्यकुमारने मोठं वक्तव्य केलंय.

प्रत्येकाला भीती असते, पण...

शुभमन दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे. त्याने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. मी खोटं बोलणार नाही, प्रत्येकाला ही भीती असते. पण ही भीती तुम्हाला प्रेरित करते. त्याची आणि माझ्यातील केमिस्ट्री मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील अद्भुत आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement

सूर्याचा वनडेच्या कॅप्टन्सीवर दावा

शुभमन कोणत्या प्रकारचा खेळाडू आणि व्यक्ती आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे मला चांगली कामगिरी करण्यास प्रेरणा मिळते, पण मी त्याच्यासाठी आनंदी आहे, असंही सूर्यकुमार यादव मनमोकळेपणाने म्हणाला आहे. यावेळी सूर्याने वनडेच्या कॅप्टन्सीवर देखील दावा केला. मी वनडेचा कॅप्टन देखील होऊ शकलो असतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement

मी अजूनही प्रयत्न करेन - सूर्यकुमार यादव

आता मला वाटतं की जर मी एकदिवसीय स्वरूपात चांगली कामगिरी केली असती, जसं सध्या टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सुरू आहे, तर मला एकदिवसीय कर्णधारपदही मिळू शकलं असतं. जर्सीचा रंगही जवळजवळ सारखाच आहे. मी अजूनही प्रयत्न करेन. आता मला वाटतं की जर मी एकदिवसीय स्वरूपात चांगली कामगिरी केली असती, असं म्हणत सूर्यकुमार यादवने शुभमन गिलला धक्का दिलाय.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया टी-ट्वेंटी - सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सैमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : 'वनडे कॅप्टन्सीसाठी मी प्रयत्न करेन...', सूर्या टी-20 ची कॅप्टन्सी गमावणार? म्हणाला 'सगळ्यांना भीती वाटते...'
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement