IND vs PAK : टीम इंडियाने हँडशेक टाळलं, इज्जत गेली! पाकड्यांना मिर्च्या झोंबल्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये हेड कोचचं मोठं वक्तव्य
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs PAK Handshake Controversy : सामना संपल्यानंतर आम्हाला भारतीय संघाशी हस्तांदोलन करायचे होते, आमच्या प्रतिस्पर्ध्याने (टीम इंडियाने) तसं केलं नाही याबद्दल आम्हाला निराशा झाली, असं पाकिस्तानचे हेड कोच माइक हेसन यांनी म्हटलं आहे.
Mike Hesson ON Ind vs Pak No Shake Hands : आशिया कपमधील सर्वात रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली आहे. सामन्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू मैदानात वाट पाहत राहिले तर टीम इंडियाचे खेळाडू थेट ड्रेसिंग रुममध्ये गेले अन् हस्तांदोलन करण टाळलं. टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करून विजय तर पाकिस्तानची नाचक्की केलीच पण सामन्यानंतर देखील पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. त्यानंतर पाकिस्तानला मिर्च्या झोंबल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानचे हेड कोच माइक हेसन यांनी पत्रकार परिषद घेतली.
काय म्हणाले माइक हेसन?
सामना संपल्यानंतर आम्हाला भारतीय संघाशी हस्तांदोलन करायचे होते, आमच्या प्रतिस्पर्ध्याने (टीम इंडियाने) तसं केलं नाही याबद्दल आम्हाला निराशा झाली, आम्ही हस्तांदोलन करण्यासाठी तिथं गेलो होतो पण ते आधीच ड्रेसिंग रूममध्ये गेले होते. सामना संपवण्याचा हा निराशाजनक मार्ग होता, आम्हाला हस्तांदोलन करायचं होतं, असं पाकिस्तानचे हेड कोच माइक हेसन यांनी म्हटलं आहे.
advertisement
शोएब अख्तर संतापला
भारतीय संघ चांगला खेळला. हा क्रिकेट सामना होता, त्याला राजकीय रंग देऊ नका. आम्ही तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींबद्दल बोलत आहोत.हस्तांदोलन करा. हा क्रिकेटचा खेळ आहे. जर मी असतो, तर नक्कीच हस्तांदोलन केले असते. मारामारी होतात, त्या घरीही होतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते वाढवत राहा. मी ते करू शकत नाही, असं शोएब अख्तर म्हणाला.
advertisement
No Handshake between India vs Pakistan, Full Video pic.twitter.com/cLeP7zy7Dd
— Abhay (@Abhay_SGill) September 14, 2025
पोस्ट मॅच प्रेझेन्टेनशमध्ये गैरहजर
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर पाकिस्तान संघाचा कॅप्टन सलमान अली आगा माध्यामांसमोर आलाच नाही. तसेच तो पोस्ट मॅच प्रेझेन्टेनशमध्ये देखील आला नव्हता. पत्रकार परिषदेत देखील त्याने तोंड दाखवलं नाही. त्यामुळे हेड कोचला प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : टीम इंडियाने हँडशेक टाळलं, इज्जत गेली! पाकड्यांना मिर्च्या झोंबल्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये हेड कोचचं मोठं वक्तव्य