ऋषभ पंतला ड्रेसिंग रुम सोडण्याचे आदेश, गंभीरने सर्वांसमोर असं काय म्हटलं? Inside Video समोर

Last Updated:

Gautam Gambhir Appreciated Rishabh pant : दुखापतीमुळे ऋषभ पंतला ड्रेसिंग रुम सोडावी लागणार आहे. त्यानंतर पंतने भारतीय टीमला भावूक संदेश देखील दिलाय. ड्रेसिंग रुममधला एक व्हिडीओ समोर आला आहे.

Gautam Gambhir Appreciated Rishabh pant
Gautam Gambhir Appreciated Rishabh pant
Team India Dressing Room Inside Video : आपल्या उतावळापणासाठी नेहमी चर्चेत असलेल्या ऋषभ पंतने पहिल्या इनिंगमध्ये आक्रमक अंदाज दाखवण्याचा प्रयत्न केला अन् त्याच्या अंगठ्याला मोठी दुखापत झाली. ऋषभ पंतचा अंगठा फ्रँक्चर झाला. ऋषभला मैदान सोडावं लागलं. ऋषभने तरीही धीर सोडला नाही. ऋषभने लढत राहिला. पहिल्या इनिंगच्या अखेरीस ऋषभ पंत पुन्हा मैदानात आला अन् अर्धशतकीय खेळी केली. ऋषभ पंतच्या याच झुंजार वृत्तीचं सर्वत्र कौतूक होत आहे. अशातच आता ऋषभ पंत टीम इंडियातून बाहेर झाल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं असल्याने त्याला ड्रेसिंग रुम सोडावी लागणार आहे. त्यानंतर ऋषभ पंतने भारतीय टीमला भावूक संदेश देखील दिलाय. ड्रेसिंग रुममधला एक व्हिडीओ समोर आला आहे.

गंभीरने केलं ऋषभचं कौतुक

टीम इंडियाचे पाया खऱ्या अर्थाने ऋषभने जे काही केलं, त्यावर आधारलेला आहे. मला व्यक्तिगत बोलायला आवडत नाही. मला व्यक्तिगत कामगिरीवर बोलायला कधीच आवडणार नाही पण तू आज जे काही केलं, ते फक्त ड्रेसिंग रुमला प्रेरित केलं नाही तर तू पुढच्या जनरेशनला प्रेरित केलंय आणि ढसा उमटवला आहे. त्यामुळे आम्हाला आणि संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे, असं गौतम गंभीर ऋषभ पंतचं कौतूक करत म्हणाला.
advertisement

ऋषभ पंत म्हणाला...

देशाला आणि माझ्या टीमला जिंकवण्यासाठी जे काही करता येईल ते मी करेल. माझ्या खासगी कामगिरीपेक्षा टीमचं हित माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. संघाची कामगिरी खरंच उल्लेखनिय होती. जशा प्रकारे दडपण होतं, पण जेव्हा संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा असतो, तेव्हा ती भावना तेव्हा ते मांडणं अवघड असतं, असं ऋषभ पंत म्हणाला. त्यावेळी ऋषभ पंत याने टीम इंडियाला मेसेज देखील दिला. आता अखेरच्या सामन्यात जिंकून या, देशासाठी खेळा, असं ऋषभ म्हणतो.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Team India (@indiancricketteam)



advertisement

ऋषभचा देशाला अभिमान - वॉशिंग्टन सुंदर 

दरम्यान, ऋषभ ज्या समस्येतून जातोय, ते खरंच खूप वेदनादायी आहे. त्याच्या अंगठ्याला फ्रँक्चर आहे. मी जेव्हा त्याचा पाय पाहिला, तेव्हा त्याचा पाय खूप सुजला होता. अशा परिस्थितीत चालणं अवघड असतं पण त्याने त्याहून मोठं काम केलंय. देशाला त्याचा अभिमान आहे, असं वॉशिंग्टन सुंदर म्हणाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ऋषभ पंतला ड्रेसिंग रुम सोडण्याचे आदेश, गंभीरने सर्वांसमोर असं काय म्हटलं? Inside Video समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement