IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची Playing XI तयार! सूर्या कुणाला बनवणार बळीचा बकरा? अर्शदीपची एन्ट्री फिक्स!

Last Updated:

Team India Playing XI : विजयासह आशिया कपची सुरूवात केल्यानंतर आता पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया कोणत्या खेळाडूंसह उतरेल? असा प्रश्न विचारला जातोय.

Team India Playing XI against Pakistan in Asia cup 2025
Team India Playing XI against Pakistan in Asia cup 2025
India vs Pakistan, Asia Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपचा महामुकाबला रविवार, 14 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यावर संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी देश हा सामना जीव लावून खेळतील. अशातच आता टीम इंडियामध्ये कुणाला संधी मिळणार? कुणाला डच्चू मिळणार? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, जो त्याच्या स्फोटक फलंदाजीने पाकिस्तानचा खेळ खल्लास करेल. तर चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा आपल्याच अंदाजात पाकिस्तानचा धुवून काढण्याचं काम करेल. तिलक वर्माने भारतासाठी 26 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 49 च्या सरासरीने 749 धावा केल्या आहेत.
advertisement
तर पाचव्या क्रमांकावर विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन उतरु शकतो. संजू कोणत्या परिस्थितून सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. संजू सॅमसनने टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 शतके आणि 2 अर्धशतके केली आहेत. तसेच सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या याला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सूर्या पाकिस्तानविरुद्ध मोठा निर्णय घेऊ शकतो. सूर्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन शिवम दुबे याला बाहेर बसवण्याची शक्यता आहे. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना बाहेर बसवणं शक्य नसल्याने सूर्याला शिवम दुबेला बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल.
advertisement
जर अर्शदीप सिंग संघात आला तर शिवम दुबेचा बाहेरचा रस्ता फिक्स मानला जातोय. त्यामुळे संघात संतूलन देखील दिसून येईल. एवढंच नाही तर बुमराहसोबत अर्शदीपची बॉलिंग किती घातक ठरणार? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.
advertisement
टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची Playing XI तयार! सूर्या कुणाला बनवणार बळीचा बकरा? अर्शदीपची एन्ट्री फिक्स!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement