Team India : ऑस्ट्रेलियाच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत अर्शदीप अन् जितेश शर्माचा ब्रोमान्स, प्रॅक्टिस सेशनमधील Video व्हायरल!

Last Updated:

Arshdeep and Jitesh Sharma bromance video : टीम इंडिया पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यासाठी सराव करताना दिसत आहे. अशातच अर्शदीप सिंग आणि विकेटकीपर जितेश शर्मा यांचा ब्रोमान्स पहायला मिळाला.

arshdeep singh and Jitesh sharma bromance video Viral
arshdeep singh and Jitesh sharma bromance video Viral
Team India practice session Video : 3 वनडे मॅचच्या सीरिजनंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. सीरिजचा पहिला सामना 29 ऑक्टोबरला कॅनबेरामध्ये होणार आहे. वनडे सीरिजच्या तीनही मॅचमध्ये खेळलेले श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज भारताच्या टी-20 टीमचा भाग नाहीत. त्यामुळे श्रेयस अय्यर वळगता इतर खेळाडू भारतासाठी रवाना झाले आहेत. अशातच आता टी-ट्वेंटी टीम इंडिया प्रॅक्टिस करताना दिसतीये, ते ही 8 डिग्री सेल्शियस तापमानात..

अर्शदीप आणि जितेशचा ब्रोमान्स

टीम इंडिया पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यासाठी सराव करताना दिसत आहे. अशातच टीम इंडियाचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट बॉलर अर्शदीप सिंग आणि विकेटकीपर जितेश शर्मा यांचा ब्रोमान्स पहायला मिळाला. अर्शदीप सिंग याने जितेशला कडकडून मिठी मारली. त्यावेळी इतर खेळाडू त्याच्याकडे एकटक पाहत असल्याचं दिसतं. टीम इंडिया सराव करत असताना तापमान फक्त 8 डिग्री सेल्शियस होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement

पाहा Video

advertisement

टी-ट्वेंटी मालिकेचं वेळापत्रक

दरम्यान, टीम इंडियाचा सीरिजचा पहिला सामना 29 ऑक्टोबरला तर पुढील 4 सामने 31 ऑक्टोबर, 2 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबरला होतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.45 वाजता सुरू होईल. या सामन्यात काही अंशी पावसाची देखील शक्यता आहे.
advertisement

भारताचा टी-20 संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : ऑस्ट्रेलियाच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत अर्शदीप अन् जितेश शर्माचा ब्रोमान्स, प्रॅक्टिस सेशनमधील Video व्हायरल!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement