Team India : वर्ल्ड कप जिंकताच अमोल मुझुमदारला घ्यावी लागली विशेष परवानगी, 24 तासात कोचसोबत असं काय घडलं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाने पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला आहे. वर्ल्ड कप विजयानंतर फक्त भारतीय खेळाडूच नाही तर कोट्यवधी भारतीयांना जल्लोष केला.
मुंबई : टीम इंडियाने पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला आहे. वर्ल्ड कप विजयानंतर फक्त भारतीय खेळाडूच नाही तर कोट्यवधी भारतीयांना जल्लोष केला. टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचंही मोलाचं योगदान आहे. वर्ल्ड कप विजयानंतर अमोल मुझुमदार घरी आले तेव्हा त्यांच्या सोसायटीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. या स्वागतानंतर अमोल मुझुमदार भारावून गेले.
नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना घरी जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागली आहे. अमोल मुझुमदार हे मुंबईमध्येच राहतात, पण वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय टीम एकत्रच आहे. भारतीय टीम या विजयानंतर 5 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यासाठी टीमला मुंबईहून दिल्लीला जावं लागणार आहे, त्यामुळे अमोल मुझुमदार यांना घरी जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागली. आपल्याला उद्या परत जावं लागणार असल्याचं अमोल मुझुमदार यांनी सांगितलं आहे.
advertisement
वर्ल्ड कप विजयानंतर अमोल भावुक
'मी एक्सपेक्ट केले नव्हते. मी बायकोला फोन केला, आज घरी येतो उद्या जायचं आहे. मी विशेष परवानगी घेऊन आलो होतो. घरी जाऊन मस्त वरण भात खाईन. तुम्ही आला आहात, भरभरून शुभेच्छा दिल्या, आमचे कुटुंब आभारी आहे. मला वडिलांनी एकच गोष्ट सांगितली, काम करत राहा. खेळत होतो तेव्हा सांगितलं रन करत राहा. रन करत राहा, काम करत राहा, याचं रुपांतर होऊन वर्ल्ड कप भारतात येईल हे माहिती नव्हतं', असं अमोल मुझुमदार म्हणाले आहेत.
advertisement
'सर्वांनी सामना पाहिला असेल, यातून इन्सपिरेशन घ्या, स्पोर्ट्स लव्हिंग नेशन आपण बनूया. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने 338 रन केले, पण ते 360 होते. त्यावेळी सगळे जण खचले होते, पण आपल्याला फायनलला पोहोचायला फक्त एक रन जास्त हवी आहे, असं मी लिहिलं. खेळाडूंमुळे हे शक्य झालं. दोन वर्ष मुलींनी अमाप प्रयत्न केले', असं म्हणत अमोल मुझुमदार यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक केलं.
advertisement
'जयविजयबद्दल मी काय बोलू, आज 22 वर्ष झाली. मला बरोबर आठवत आहे, कारण माझ्या लग्नाला 23 वर्ष झाली. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, मला विचारलं कुठे राहतो तर मी सांगतो पार्लेमध्ये राहतो. तिथे जयविजय मध्ये राहतो. तुमच्या शुभेच्छा महिला टीमसोबत अशाच असू द्या', अशी प्रतिक्रिया अमोल मुझुमदार यांनी दिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 11:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : वर्ल्ड कप जिंकताच अमोल मुझुमदारला घ्यावी लागली विशेष परवानगी, 24 तासात कोचसोबत असं काय घडलं?


