टेस्ट, वनडे अन् T20, आता सगळं विसरा... क्रिकेटमध्ये आला नवा फॉरमॅट, भारतात होणार पहिली मॅच!

Last Updated:

टेस्ट, वनडे आणि टी-20 नंतर आता क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटचा जन्म झाला आहे, टेस्ट ट्वेंटी असं या नव्या फॉरमॅटचं नाव आहे.

टेस्ट, वनडे अन् T20, आता सगळं विसरा... क्रिकेटमध्ये आला नवा फॉरमॅट, भारतात होणार पहिली मॅच!
टेस्ट, वनडे अन् T20, आता सगळं विसरा... क्रिकेटमध्ये आला नवा फॉरमॅट, भारतात होणार पहिली मॅच!
मुंबई : टेस्ट, वनडे आणि टी-20 नंतर आता क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटचा जन्म झाला आहे, टेस्ट ट्वेंटी असं या नव्या फॉरमॅटचं नाव आहे, ज्याचं अधिकृत उद्घाटन गुरूवार 16 ऑक्टोबरला करण्यात आलं आहे. द वन वन सिक्स नेटवर्कचे कार्यकारी अध्यक्ष आणि क्रीडा उद्योजक गौरव बहिरवाणी यांनी या फॉरमॅटचं डिझाइन केलं आहे.
टेस्ट आणि टी-20 या दोन सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात लहान फॉरमॅटचं अंतर कमी करण्यासाठी या फॉरमॅटची स्थापन करण्यात आली आहे. या नव्या फॉरमॅटमध्ये टेस्ट क्रिकेटचा आत्मा आणि टी-20 फॉरमॅटचा वेग असेल, जो चाहत्यांना आकर्षित करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. टेस्ट ट्वेंटी फॉरमॅटला हरभजन सिंग, एबी डिव्हिलियर्स, सर क्लाइव्ह लॉइड आणि मॅथ्यू हेडन यांचं सहकार्य मिळालं आहे. हे सगळे दिग्गज खेळाडू या स्पर्धेच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत.
advertisement

काय आहेत नियम?

टेस्ट ट्वेंटीचा सामना हा टेस्ट आणि टी-20चं मिश्रण असेल. एक दिवसाच्या या सामन्यात एकूण 80 ओव्हर खेळवल्या जातील, ज्यात प्रत्येक टीम दोन इनिंगमध्ये 20-20 ओव्हर बॅटिंग करेल, म्हणजेच टेस्ट क्रिकेटच्या 4 इनिंगप्रमाणेच बॅटिंग केली जाईल, पण प्रत्येक टीमला 20 ओव्हर बॅटिंगचीच संधी मिळेल. टेस्ट ट्वेंटी फॉरमॅटच्या मॅचमध्ये टेस्ट क्रिकेटप्रमाणेच विजय, पराभव, टाय आणि ड्रॉ असे निकाल लागतील.
advertisement

कधी होणार पहिला सामना?

टेस्ट ट्वेंटी क्रिकेटच्या पहिल्या मोसमाची सुरूवात जानेवारी 2026 मध्ये होणार आहे, ज्यात 6 आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी सहभागी होणार आहेत. एकूण 6 फ्रँचायझीपैकी तीन टीम भारतातल्या तर एक दुबई, लंडन आणि युएसएमधील असेल. प्रत्येक टीममध्ये 16 खेळाडू निवडले जातील, ज्यात 8 खेळाडू भारतीय आणि 8 परदेशी असतील.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टेस्ट, वनडे अन् T20, आता सगळं विसरा... क्रिकेटमध्ये आला नवा फॉरमॅट, भारतात होणार पहिली मॅच!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement