Tilak Varma : 'मुंबई नही तो क्या...', फायनलला रडवलं, 10 दिवसांनी तिलकने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं

Last Updated:

आशिया कपच्या फायनलच्या 10 दिवसांनंतर तिलक वर्माने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

'मुंबई नही तो क्या...', फायनलला रडवलं, 10 दिवसांनी तिलकने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं
'मुंबई नही तो क्या...', फायनलला रडवलं, 10 दिवसांनी तिलकने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं
मुंबई : आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात एकूण 3 सामने झाले या तीनही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली. तीनही सामन्यांमध्ये फायनल मात्र रोमांचक झाली. पाकिस्तानने दिलेल्या 147 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत आली होती, पण तिलक वर्माने मॅच विनिंग खेळी केली.
तिलकने 53 बॉलमध्ये नाबाद 69 रन केले, ज्यात 3 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची अवस्था 20 रनवर 3 विकेट अशी झाली होती, तेव्हा तिलक बॅटिंगला आला आणि यानंतर त्याने आधी संजू सॅमसन आणि मग शिवम दुबेसोबत महत्त्वाची पार्टनरशीप करून भारताला विजय मिळवून दिला.
advertisement
तिलक वर्मा जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा पाकिस्तानचा विकेट कीपर मोहम्मद हारिसने त्याला स्लेज केलं. ही मुंबई नसल्याचं मोहम्मद हारिस तिलकला म्हणाला, पण तिलकने मोहम्मद हारिसच्या या स्लेजिंगवर बॅटनेच प्रत्युत्तर दिलं. आता आशिया कपच्या फायनलनंतर तिलक वर्माने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. 'ये मुंबई नही तो क्या हुआ, हम मुंबईवाले है', असं तिलक म्हणाला आहे. मुंबई इंडियन्सने तिलकचं हे रील सोशल मीडियावर अपलोड केलं आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)



advertisement

काय म्हणाला तिलक?

तू बॅटिंग करत होतास, तेव्हा मागून आवाज आला ही मुंबई नाही, तेव्हा तुझ्या मनात काय चाललं होतं? यावर तिलकने पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला आहे. मुंबई नाही तर काय झालं, मुंबईवाला तर आहे, असं तिलक वर्मा म्हणाला आहे. मुंबई इंडियन्सने तिलक वर्माचं हे रील सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तिलकचं हे रील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
advertisement

तिलक मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का

तिलक वर्मा हा त्याच्या आयपीएल पदार्पणापासूनच मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. आयपीएल 2022 साली तिलकने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं, तेव्हापासून तो मुंबईच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहे. आयपीएलमधल्या धमाकेदार कामगिरीनंतरच तिलक वर्माची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Tilak Varma : 'मुंबई नही तो क्या...', फायनलला रडवलं, 10 दिवसांनी तिलकने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement