IND vs ENG : मुंबईच्या खेळाडूचा इंग्लंडमध्ये धमाका, सलग दुसऱ्या टेस्टमध्य वादळी खेळी, टीम इंडियात मिळणार संधी?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबईच्या एका खेळाडूने इंग्लंडमध्ये मोठा धमाका केला आहे.या खेळाडूने सलग दुसऱ्या टेस्टमध्ये वादळी खेळी केली आहे.त्यामुळे या खेळाडूला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे.
County Championship : टीम इंडियाचा सिनिअर संघ पाच सामन्यांची टेस्ट मालिका इंग्लंडमध्ये खेळतोय. यासोबत भारताचे काही खेळाडू इंग्लंडला काऊंटी चॅम्पियन्सशीप खेळायला पोहोचले आहेत.यापैकी आता मुंबईच्या एका खेळाडूने इंग्लंडमध्ये मोठा धमाका केला आहे.या खेळाडूने सलग दुसऱ्या टेस्टमध्ये वादळी खेळी केली आहे.त्यामुळे या खेळाडूला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून मुंबई इंडियन्सचा तिलक वर्मा आहे. तिलक वर्मा हा हॅम्पशायर संघाकडून काउंटी चॅम्पियन्सशीप खेळत आहे.या स्पर्धेत हॅम्पशायर विरूद्ध वॉर्सेस्टरशायर यांच्यात सामना सूरू आहे. या सामन्यात तिलक वर्माने 56 धावांची अर्धशतकीय खेळी केली.
दरम्यान याआधी एसेक्सविरूद्ध खेळताना पहिल्या डावात तिलक वर्माने आपल्या संघासाठी शतक झळकावले होते. त्याने 239 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. या डावात त्याने 241 बॉल खेळले असले तरी तो 100 धावांवर बाद झाला. तिलकने या डावात 3 उत्कृष्ट षटकार आणि 11चौकार मारले. ब्रेन ब्राउनसोबत मिळून त्याने पाचव्या विकेटसाठी 133 धावांची शतकी भागीदारी केली होती.
advertisement
दरम्यान या सामन्यात वॉर्सेस्टरशायरने पहिल्या डावात 7 विकेट गमावून 679 धावा केल्या आहेत. त्यानंतर हॅम्पशायर पहिल्या डावात 221 धावांवर ऑलआऊट झाला. या डावात तिलक वर्माने सर्वाधिक अर्धशतकीय खेळी केली होती. आता वॉर्सेस्टरशायरने हॅम्पशायरला फॉलोऑन दिले आहे.त्यामुळे हॅम्पशायर जिंकण्यासाठी आता 458 धावांची गरज आहे.
तिलक वर्माची काऊंटी स्पर्धेतील ही कामगिरी पाहता त्याला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 01, 2025 8:57 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : मुंबईच्या खेळाडूचा इंग्लंडमध्ये धमाका, सलग दुसऱ्या टेस्टमध्य वादळी खेळी, टीम इंडियात मिळणार संधी?