IPL 2025 : पंजाबविरूद्ध सामन्याआधी अजिंक्य रहाणेची मोठी खेळी, जम्मू काश्मिरच्या खेळाडूला घेतलं ताफ्यात, श्रेयसच्या अडचणी वाढणार?

Last Updated:

अजिंक्य रहाणेने मोठी खेळी केली आहे. अजिंक्य रहाणे एका स्टार खेळाडूला ताफ्यात घेतलं आहे. हा खेळाडू जम्मू काश्मिरचा आहे, आणि त्याच्याच 157 च्या वेगाने गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे.

ajinkya Rahane, shreyas iyer
ajinkya Rahane, shreyas iyer
KKR vs PBKS : आयपीएलच्या 18 व्या हंगामात आज पंजाब किंग्ज आणि कोलकत्ता नाईट रायडर्स हे दोन संघ भिडणार आहेत.या सामन्याआधी अजिंक्य रहाणेने मोठी खेळी केली आहे. अजिंक्य रहाणे एका स्टार खेळाडूला ताफ्यात घेतलं आहे. हा खेळाडू जम्मू काश्मिरचा आहे, आणि त्याच्याच 157 च्या वेगाने गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे हा खेळाडू श्रेयस अय्यरच्या अडचणी वाढणार आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाला 8 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. आता त्यांच्याजवळ आणखीण सहा सामने उरले आहेत. त्यामुळे आता त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सहा सामन्यांमधून पाच सामने जिंकणे आवश्यक आहे.अशा परिस्थितीत आता प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आता कोलकत्ता संघाने एका काश्मिरी खेळाडूचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूचे नाव उमरान मलिक आहे. 25 वर्षीय उमरान हा जम्मू-काश्मीरमधील गुजर नगर येथील रहिवासी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज कोलकाता संघात सामील झाला आहे. केकेआरने त्याला मेगा लिलावात ७५ लाख रुपयांना खरेदी केले होते. पण दुखापतीमुळे तो मार्चच्या सुरुवातीला स्पर्धेतून बाहेर पडला.
advertisement
दुखापतीमुळे त्रस्त असलेला उमरान मलिक आयपीएल 2025 च्या पहिल्या भागात खेळू शकला नाही. तो बाहेर पडल्यावर त्याच्या जागी फिरकी गोलंदाज चेतन सकारियाला संधी देण्यात आली. पण आता तो आयपीएल 2025 च्या दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा तंदुरुस्त झाला आहे आणि संघातही सामील झाला आहे. पण आता केकेआर उमरानला त्यांच्या संघात कसे स्थान देते हे पाहावे लागेल, कारण त्याच्या जागी चेतन सकारिया आधीच आहे.
advertisement

157 वेगाने गोलंदाजीची क्षमता

उमरान मलिकने 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात 150 च्या वेगाने गोलंदाजी करून बातम्यांमध्ये स्थान मिळवले. एसआरएचमध्ये बदली खेळाडू म्हणून सामील झालेल्या उमरानला या हंगामात फक्त 3 सामने खेळण्याची संधी मिळाली,परंतु त्यातही तो सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी झाला. यानंतर, आयपीएल 2022 मध्ये, त्याने 157 च्या वेगाने गोलंदाजी करून खळबळ उडवून दिली.
advertisement
उमरान मलिक हा आयपीएलमधील सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज आहे.एकूणच, तो शॉन टेट आणि लॉकी फर्ग्युसन नंतर तिसरा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. तथापि, यानंतर त्याला दुखापती होत राहिल्या, ज्यामुळे तो जास्त सामने खेळू शकला नाही. २०२१ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून, तो या स्पर्धेत फक्त २६ सामने खेळू शकला आहे. एवढेच नाही तर २०२२ वगळता तो कधीही पूर्ण आयपीएल हंगाम खेळलेला नाही. याशिवाय उमरानने २०२३ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.
advertisement

पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया

उमरान मलिक यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, "पहलगाममध्ये हृदयद्रावक दृश्ये पाहायला मिळाली. एका निरर्थक दहशतवादी घटनेत निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अशा क्रूरतेचे शब्दात समर्थन करता येणार नाही. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत एकजुटीने उभे राहा. द्वेषावर शांतीचा नेहमीच विजय होईल."
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : पंजाबविरूद्ध सामन्याआधी अजिंक्य रहाणेची मोठी खेळी, जम्मू काश्मिरच्या खेळाडूला घेतलं ताफ्यात, श्रेयसच्या अडचणी वाढणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement