सातारा मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं मारली बाजी, नागपूरची लेकही अव्वल!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
या स्पर्धेमुळे साताऱ्यात मॅरेथॉनमय वातावरण निर्माण झालं. स्पर्धेसाठी पोषक वातावरण निर्मिती झाली होती. 8 हजारांहून अधिक स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : 'अहं युद्ध' या टायटलनं यंदाची सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा दणक्यात पार पडली. स्वतः खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी झेंडा दाखवून या मॅरेथॉनचं उद्घाटन केलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेखही उपस्थित होते. 21 किलोमीटरची ही हिल हाफ मॅरेथॉन पोलीस परेड ग्राउंडमधून सुरू झाली. या स्पर्धेचा रूट खूप खडतर आहे, जो पार करून पुरुष गटात कोल्हापूरचा पठ्ठ्या उत्कर्ष पाटील यानं बाजी मारली, तर महिला गटात नागपूरची रणरागिणी तेजस्विनी लांबकाने पहिली आली.
advertisement
सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला 1 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता सुरूवात झाली. पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगर परिषद, अदालत वाडा, समर्थ मंदिर, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून, हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हिल रिसॉर्ट आणि नित्यमुक्त साई रिसॉर्टपर्यंत जाऊन पुन्हा त्याच मार्गानं माघारी येऊन पोलीस परेड ग्राउंडमध्ये मॅरेथॉन समाप्त झाली.
advertisement
धावपटूंसाठी काय नियोजन?
सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीनं स्पर्धा मार्गावर पाणी, औषधं, बिस्किटं, वेदनाशामक स्प्रे, कुलिंग स्टेशन, इत्यादींची व्यवस्था केलेली असते. तसंच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फूड पॅकेट्सची व्यवस्थाही केलेली असते. स्पर्धा मार्गावर जर एखाद्या स्पर्धकाला काही त्रास झाला तर त्याच्यावर ताबडतोब प्रथमोपचार करता येतील, असं प्रशिक्षण सर्व स्वयंसेवकांना दिलेलं असतं. जर एखाद्या स्पर्धकाला जास्तच त्रास झाला तर स्पर्धा मार्गावर सुसज्ज अशा रुग्णवाहिका तैनात असतात. ज्यामुळे स्पर्धकाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करता येतं.
advertisement
दरम्यान, या स्पर्धेमुळे साताऱ्यात मॅरेथॉनमय वातावरण निर्माण झालं. स्पर्धेसाठी पोषक वातावरण निर्मिती झाली होती. 8 हजारांहून अधिक स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे देश-विदेशातील धावपटूंनी सहभाग नोंदवला होता.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
September 01, 2024 6:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सातारा मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं मारली बाजी, नागपूरची लेकही अव्वल!

