अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटरला कुणी मारलं? ACB च्या हाती लागलं Video फुटेज, पाकिस्तानचं काही खरं नाही!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pakistans kill three Afghanistan cricketers : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडे असलेल्या पुराव्यामध्ये व्हिडिओ फुटेजचाही समावेश आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तानने मोठे निर्णय घेतले आहेत.
Afghanistan cricketers killed : पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात तीन अफगाणिस्तान क्रिकेटपटूंच्या मृत्युमुळे क्रिकेट जगत शोक व्यक्त करत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते सय्यद नसीम सादत यांनी मंगळवारी घोषणा केली की, अफगाणिस्तानच्या उरगुन जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात तीन स्थानिक क्रिकेटपटू ठार झाले आहेत आणि हा हल्ला पाकिस्तानने केला असल्याचा स्पष्ट पुरावा बोर्डाकडे आहे.
टी20 सीरीजमधून माघार
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडे असलेल्या पुराव्यामध्ये व्हिडिओ फुटेजचाही समावेश आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तानने पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ट्राय-नॅशनल टी20 सीरीजमधून माघार घेतली आहे. पाकिस्तान सरकारने हवाई हल्ल्यात क्रिकेटपटू मारले गेल्याचा इन्कार केल्यानंतर एसीबीचे हे विधान आले आहे.
पाकिस्तानविरुद्ध पुरावे आमच्याकडे
सादत यांनी एएनआयला (ANI) सांगितले, "या घटनेचा व्हिडिओ रिपोर्ट आमच्या मीडिया टीमने बनवला आहे आणि तो जगभरातील क्रिकेट बंधुत्वाने नक्कीच पाहिला असेल. हल्ला पाकिस्तानी राज्याने केला असल्याचे स्पष्ट पुरावे आमच्याकडे आहेत."
advertisement
शांततेचा संदेश देणारा खेळ
सादत यांनी पुढे म्हटले की, "क्रिकेट हा शांततेचा संदेश देणारा गेम आहे. क्रिकेटपटू हे शांततेचे दूत आहेत आणि त्यांना युद्धापासून दूर ठेवले पाहिजे. युद्धाचा खेळावर परिणाम होता कामा नये. त्यामुळे आम्ही सर्व क्रिकेट बोर्डांना आणि क्रिकेट बंधुत्वाला अशा अमानुष हल्ल्यांचा निषेध करण्याचे आणि क्रिकेटला युद्धापासून दूर ठेवण्याचे आवाहन करतो."
advertisement
#WATCH | Kabul | Afghanistan Cricket Board Spokesperson Sayed Naseem Sadaat says, "A few days ago, the Pakistani state launched an airstrike on Urgun district of Paktika, that martyred a number of our innocent people, along with three rising cricket stars from the province who… pic.twitter.com/JUWtFtSqAi
— ANI (@ANI) October 21, 2025
advertisement
बीसीसीआयचा अफगाणिस्तानला पाठिंबा
या दुःखद घटनेनंतर इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल आणि बीसीसीआयनेही एसीबीला पाठिंबा दर्शवला आहे. "हा अफगाणिस्तानच्या क्रीडा समुदायासाठी, खेळाडूंसाठी आणि क्रिकेट कुटुंबासाठी एक मोठा लॉस आहे," असं एसीबीने स्पष्ट केलं आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड
दरम्यान, सध्या तरी, निर्णय फक्त तिरंगी मालिकेबद्दल घेण्यात आला आहे. भविष्यात, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड जो काही निर्णय घेईल तो राष्ट्रीय हिताचा विचार करूनच घेतला जाईल, असं देखील अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते सय्यद नसीम सादत यांनी म्हटलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 8:23 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटरला कुणी मारलं? ACB च्या हाती लागलं Video फुटेज, पाकिस्तानचं काही खरं नाही!