'...तर विराट कोहली आज Mumbai Indians मध्ये असला असता', Vijay Mallya ने सांगितलं कोणते 4 खेळाडू RCB मध्ये हवेत?

Last Updated:

Vijay Mallya interview Video : भारतात वाँटेड असलेल्या विजय मल्ल्याने एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला की त्याने मुंबई इंडियन्ससह एकूण तीन फ्रँचायझींसाठी बोली लावली होती.

Vijay Mally On buy RCB Team
Vijay Mally On buy RCB Team
Vijay Mally On buy RCB Team : भारताचा भगोडा आणि मोस्ट वॉन्टेड विजय मल्ल्या याने राज समानी यांच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे. त्यावेळी यावेळी आरसीबीला खरेदी कसं केलं? यावर खुलासा केलाय. ललित मोदींनी बीसीसीआय समितीला या लीगबाबत दिलेल्या सल्ल्याने मी खूप प्रभावित झालो. त्यांनी एके दिवशी मला फोन केला आणि सांगितले की संघांचा लिलाव होणार आहे. तुम्हाला ते खरेदी करायचे आहे का? मी म्हणालो ठीक आहे, मी तीन फ्रँचायझींवर बोली लावली आणि मी मुंबईकडून खूप कमी पैशांनी हरलो, असं विजय मल्ल्या म्हणाला.

विजय मल्ल्याला हवी होती मुंबईची टीम

मुंबई इंडियन्ससह एकूण तीन फ्रँचायझींसाठी बोली लावली होती. मात्र, ती मुकेश अंबानी यांनी विकत घेतली. विजय मल्ल्याने अखेर 2008 मध्ये आरसीबीला 112 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतलं होतं. त्याची किंमत सध्याच्या परिस्थितीत 600 कोटी रुपये आहे. मी आरसीबी फ्रँचायझीसाठी बोली लावली तेव्हा मला आयपीएल भारतीय क्रिकेटसाठी एक गेम-चेंजर म्हणून दिसलं. मी अखेर 112 दशलक्ष डॉलर्सची बोली लावली, जी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बोली होती, असं विजय मल्ल्या म्हणाला.
advertisement

रॉयल चॅलेंजशी जोडली बंगळुरू टीम

माझे स्वप्न बंगळुरूच्या भावनेला मूर्त रूप देणारा संघ तयार करण्याचा होता. मला आरसीबी असा ब्रँड बनवायचा होता जो केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही ओळखला जातो. म्हणूनच मी ते रॉयल चॅलेंजशी जोडले आहे, जे आमच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मद्य ब्रँडपैकी एक आहे. जेणेकरून त्याला एक मजबूत ओळख मिळेल, असंही विजय मल्ल्या यावेळी म्हणाला.
advertisement

विराट कोहलीला का घेतलं? 

मी अशा खेळाडूंची निवड केली जे आरसीबीला एक पॉवर हाऊस बनवू शकतील. माझ्यासाठी सर्वात मोठा अभिमान म्हणजे अंडर-19 वर्ल्ड कप संघातील तरुण विराट कोहलीचं सिलेक्शन... मला मनापासून वाटत होतं की तो खास आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर बोली लावली, असं विजय मल्ल्या म्हणाला.

RCB मध्ये हवेत चार खेळाडू

advertisement
दरम्यान, विजय मल्ल्या याने यावेळी चार अशा खेळाडूंची नाव सांगितली, जे खेळाडू आरसीबीमध्ये हवे होते. आरसीबीसाठी काही खेळाडू निवडण्याची संधी आहे का, तर ते खेळाडू कोण असतील? असा सवाल विचारल्यावर मल्ल्याने जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि केएल राहुल या चार खेळाडूंची नावं सांगितली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'...तर विराट कोहली आज Mumbai Indians मध्ये असला असता', Vijay Mallya ने सांगितलं कोणते 4 खेळाडू RCB मध्ये हवेत?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement