VIDEO : चेहरा लपवला पण अश्रूंचा बांध फुटला! शेवटची ओव्हर संपायच्या आधीच कोहलीच्या डोळ्यात पाणी, पाहा भावनिक क्षण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Virat Kohli cry : फायनल सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 17 वर्षानंतर आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर कोहलीला अश्रू अनावर झाले आहे.
Virat Kohli cry : फायनल सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 17 वर्षानंतर आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर कोहलीला अश्रू अनावर झाले आहे. विशेष म्हणजे शेवटची ओव्हर संपायच्या आधीच कोहलीच्या डोळ्यात पाणी आले होते. या संदर्भातला व्हिडिओ देखीव व्हायरल झाला आहे.
खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये कोहलीने आधी चेहरा लपवला.त्याचे डोळे अक्षरश लाल झाले होते आणि डोळयात अश्रू होते. त्यानंतर तो हाताने अश्रू पूसताना दिसला होता. मात्र अश्रू पूसून देखील ते थांबायचं नाव घेत नव्हते. त्यानंतर कोहली पुन्हा रडायला लागला होता. त्यानंतर मैदानात बसून तो रडला होता. कोहलीचा रडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
VIRAT KOHLI IN TEARS - THE DREAM MOMENT FOR THE GOAT ❤️ pic.twitter.com/jPxUsccRUL
— Johns. (@CricCrazyJohns) June 3, 2025
कसा रंगला सामना
रॉयल चँलेंजर्स बंगळूरूने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सूरूवात चांगली झाली होती. पण तरीही खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नाही. शशांकने नाबाद 61 धावा केल्या.पण खूप उशीर झाला होता. त्याच्या व्यतिरीक्त कोणत्याही खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नाही आणि पंजाबने हातचा सामना गमावला.
advertisement
आयपीएलच्या फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चँलेंजर्स बंगळूरूने 190 धावा ठोकल्या आहेत.यामध्ये कोहलीने सर्वांधिक 43 धावांची खेळी केली होती.बाकी आरसीबीच्या खेळाडूंना 30चा धावाही गाठता आला नाही.तरीही आरसीबी 190 पर्यंत पोहोचली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 12:01 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : चेहरा लपवला पण अश्रूंचा बांध फुटला! शेवटची ओव्हर संपायच्या आधीच कोहलीच्या डोळ्यात पाणी, पाहा भावनिक क्षण