RCB फॅन्ससाठी विराट कोहलीची इन्स्टाग्राम पोस्ट, भावुक होत म्हणाला, 'तू 18 वर्ष साथ सोडली नाही पण...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Kohli Instragram Post : आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव करत दुष्काळ संपवला. त्यानंतर आता विराट भावुक झाल्याचं पहायला मिळतंय.
Virat kohli Post for fans of RCB : आयपीएल 2025 च्या फायनलनंतर आता अखेर 18 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ने IPL 2025 ची ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर संघाचा कर्णधार आणि आधारस्तंभ विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. चाहत्यांसाठी आणि संघासाठी हा विजय किती महत्त्वाचा आहे, हे त्याने या पोस्टमध्ये अधोरेखित केले. आरसीबी संघाचं हे स्वप्न प्रत्यक्षात आणले, हा हंगाम मी कधीही विसरू शकणार नाही. गेल्या अडीच महिन्यांपासून आम्ही या प्रवासाचा मनसोक्त आनंद घेतला आहे, असं विराट पोस्टमध्ये म्हणाला आहे.
काय काय म्हणाला विराट कोहली?
चाहत्यांचे आभार मानताना विराट भावूक झाला. त्याने म्हटले, "हा विजय RCB च्या त्या चाहत्यांसाठी आहे, ज्यांनी आमच्या सर्वात वाईट काळातही आमची साथ कधीही सोडली नाही. हा विजय अनेक वर्षांच्या हृदयभंगासाठी आणि निराशेसाठी आहे." मैदानावर दिलेल्या प्रत्येक प्रयत्नाचा उल्लेख करत कोहली म्हणाला, "या संघासाठी मैदानावर दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी हा विजय आहे."
advertisement
advertisement
आयपीएल ट्रॉफीला म्हणाला...
सर्वात शेवटी, IPL ट्रॉफीबद्दल बोलताना कोहलीने आपली दीर्घकाळची प्रतीक्षा व्यक्त केली. "IPL ट्रॉफीबद्दल बोलायचं तर – मला तुला उचलता यावं आणि तुझ्यासोबत जल्लोष करता यावा यासाठी तू मला 18 वर्षे वाट पाहायला लावलीस मित्रा, पण ही वाट पाहणे पूर्णपणे सार्थकी लागले आहे," असंही विराट कोहली म्हणाला. विराट कोहलीच्या या इन्स्टाग्राम पोस्टने पुन्हा एकदा त्याचे RCB आणि चाहत्यांशी असलेले अतूट नाते दर्शवले आहे. हा विजय केवळ संघासाठीच नव्हे, तर वर्षानुवर्षे संघास पाठिंबा देणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांसाठीही किती महत्त्वाचा आहे, हे त्याच्या शब्दांतून स्पष्ट झालंय.
advertisement
विराट कोहलीचा कामगिरी
दरम्यान, आयपीएल 2025 चा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) साठी ऐतिहासिक ठरला, कारण त्यांनी अखेर आपले पहिले विजेतेपद पटकावले. या विजयात संघाचा कर्णधार विराट कोहली याची कामगिरी अत्यंत निर्णायक ठरली. संपूर्ण हंगामात त्याने फलंदाजीमध्ये सातत्य राखले आणि संघाला अनेक महत्त्वाच्या क्षणी आधार दिला. या हंगामात कोहलीने 15 सामन्यांमध्ये 657 धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सरासरी 54.75 होती आणि स्ट्राइक रेट 144.71 होता. त्याने या हंगामात आठ अर्धशतके झळकावली
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 9:14 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB फॅन्ससाठी विराट कोहलीची इन्स्टाग्राम पोस्ट, भावुक होत म्हणाला, 'तू 18 वर्ष साथ सोडली नाही पण...'