Virat Kohli : विराट कोहलीने केली अर्शदीप सिंगची नक्कल, रोहित शर्मा हसून हसून लोटपोट झाला, पाहा Video

Last Updated:

Virat Kohli Viral Video : विराटने अर्शदीपच्या धावण्याच्या स्टाईलची हुबेहूब नक्कल केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.

Virat Kohli mimicking Arshdeep Singh
Virat Kohli mimicking Arshdeep Singh
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे सिरीजसाठी भारतीय टीमने वडोदरा येथे जोरदार तयारी सुरू केली आहे. मैदानावर सरावाचा कडाका सुरू असतानाच खेळाडूंच्या मधील हलके-फुलके क्षणही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ट्रेनिंग सेशनमधील एका विशिष्ट घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, त्यात एका स्टार खेळाडूचा मजेशीर अंदाज पाहायला मिळत आहे. सिरीज सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचा आत्मविश्वास आणि त्यांच्यातील बॉन्डिंग पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखीच वाढलाय. अशातच विराटच्या व्हिडीओने तुम्ही देखील हसून हसून लोटपोट व्हाल.

अर्शदीप स्टाईलची हुबेहूब नक्कल

विराट कोहली सध्या अतिशय चांगल्या मूडमध्ये असून त्याने प्रॅक्टिस दरम्यान युवा फास्ट बॉलर अर्शदीप सिंहची नक्कल केली. विराटने अर्शदीपच्या धावण्याच्या स्टाईलची हुबेहूब नक्कल केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. विराटने केवळ मस्करीच केली नाही, तर नेट्समध्ये 90 मिनिटं घाम गाळून आपली बॅटिंग धारदार केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 77 आणि 131 रन्सची खेळी केल्यानंतर विराट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असून त्याने स्पिनर्स आणि फास्ट बॉलर्सचा आक्रमकपणे सामना केला.
advertisement

बाउन्सी बॉल्सवर प्रॅक्टिस

टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल यानेही आपला सराव पूर्ण केला असून दुखापतीनंतर तो आता पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे. रोहित शर्मा आणि विराटने मिळून थ्रोडाउन स्पेशलिस्ट्सच्या बाउन्सी बॉल्सवर प्रॅक्टिस केली. दुसरीकडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज हे खेळाडू गुरुवारी मॅच खेळल्यामुळे या सत्रात सहभागी होऊ शकले नाहीत, पण ते लवकरच टीमला जॉईन होतील. रविवारी या सिरीजमधील पहिली मॅच खेळवली जाणार आहे.
advertisement
न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडिया - शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (व्हाईस कॅप्टन), वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जायसवाल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : विराट कोहलीने केली अर्शदीप सिंगची नक्कल, रोहित शर्मा हसून हसून लोटपोट झाला, पाहा Video
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement