Virrender Sehwag चा पत्नी आरतीसोबत घटस्फोट? दोन फोटो शेअर करत वीरूने दिले संकेत, BCCI अध्यक्षांची चर्चा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virrender Sehwag Divorce Rumors : टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनर ओपनर वीरेंद्र सेहवाग याच्या घटस्फोटाच्या चर्चा आणखी रंगल्याचं पहायला मिळतंय. त्याला कारण वीरूने शेअर केलेले दिवाळीचे फोटो.
Virender Sehwag Wife Aarti divorce : सध्याच्या काळात लग्नादरम्यान दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. गेल्या काही काळापासून, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागची पत्नी लवकरच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करणार असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. अशातच आता वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती आणि मिथुन मनहास डेटिंग करत असल्याच्या अफवा समोर आल्या होत्या. अशातच आता वीरेंद्र सेहवागने शेअर केलेल्या फोटोमधून अनेक अर्थ निघण्यास सुरूवात झाली आहे.
इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो
सेहवागची पत्नी आरती अहलावत हिचे सध्या माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हासशी नाव जोडलं जात आहे. दोघे डेटिंग करत असल्याची माहिती काही रिपोर्टमधून समोर आली होती. त्यानंतर आरती आणि सेहवागने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं अन् अफवांवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानतंर आता दिवाशीच्या मुहूर्तावर सेहवागने काही फोटो शेअऱ केले आहेत.
advertisement
दिवाळीच्या फोटोमध्ये सेहवागची बायको नाही
सेहवागने दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत, त्यात त्याची आई आणि दोन मुलं दिसत आहेत. पण या फोटोमध्ये सेहवागची बायको दिसत नाही. त्यामुळे अफवा खऱ्या असल्याची चर्चा होताना दिसतीये. हिरव्या कलरच्या कुर्तामध्ये सेहवाग दिसतोय. तर सेहवागची आई लाल ड्रेसमध्ये आहे. तर सेहवागची दोन्ही मुलं निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहेत.
advertisement
दीपज्योतिः परं ब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः । दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥
May you leave your sparkle wherever you go. Happy Deepawali pic.twitter.com/6kaXAd8Xm1
— Virrender Sehwag (@virendersehwag) October 20, 2025
नामांकित कुटुंबातील आरती
दरम्यान, आरती ही एका नामांकित कुटुंबामधून सेहवागच्या घरात आली आहे. आरती भारतामधील नामांकित वकिल असलेल्या सूरज अहलावत यांची मुलगी आहे. त्यामुळे आरती ही सुरुवातीपासूनच श्रीमंतीमध्ये वाढलेली आहे. आता आरती सेहवागबरोबर राहत नसल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आरती ही भारती विद्या भवन येथे होती. त्यानंतर आरतीने Computer Science मध्ये डिग्री तिने घेतली आहे. ती फक्त गृहिणी नाही तर ती एक बिझनेस वुमनही आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 10:33 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virrender Sehwag चा पत्नी आरतीसोबत घटस्फोट? दोन फोटो शेअर करत वीरूने दिले संकेत, BCCI अध्यक्षांची चर्चा!