Cricket News : राहुल द्रविड नंतर कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच? 'या' दिग्गज क्रिकेटरची होऊ शकते निवड

Last Updated:

राहुल द्रविड याचं टीम इंडिया सोबत हेड कोच म्हणून कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षांचं होत. परंतु आता स्वतः राहुल द्रविड हे कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात रस दाखवत नसल्याने टीम इंडीयाचा नवा हेड कोच म्हणून एका दिग्गज क्रिकेटरच नाव सध्या चर्चेत आहे.

राहुल द्रविड नंतर कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच?
राहुल द्रविड नंतर कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच?
मुंबई, 23 नोव्हेंबर : आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या फायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर आता टीम इंडियाचा हेड कोच लवकरच बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या टीम इंडियाचा हेड कोच असलेला माजी क्रिकेटर राहुल द्रविड हा त्याचं कॉन्ट्रॅक्ट वाढवण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. त्यामुळे राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा हेड कोच कोण बनणार याबद्दल विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. राहुल द्रविड याचं टीम इंडिया सोबत हेड कोच म्हणून कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षांचं होत. परंतु आता स्वतः राहुल द्रविड हे कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात रस दाखवत नसल्याने टीम इंडीयाचा नवा हेड कोच म्हणून एका दिग्गज क्रिकेटरच नाव सध्या चर्चेत येत आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या रिपोर्टनुसार, राहुल द्रविड आपले कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यास इच्छूक नाही. अनेक सूत्रांकडून असे सांगण्यात आले आहे की, राहुल द्रविडने बीसीसीआयला त्याचे हेड कोच म्हणून कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे राहुल द्रविडनंतर टीम इंडियाच्या हेड कोचची जबाबदारी ही दिग्गज क्रिकेटर वीवीएस लक्ष्मणला दिली जाऊ शकते. वीवीएस लक्ष्मण सध्या बंगलोर स्थित क्रिकेट अकॅडमीच्या डायरेक्टर पदी कार्यरत आहे.
advertisement
वीवीएस लक्ष्मण टीम इंडियाचे हेड कोच म्हणून साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर येऊ शकतात. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत लिहिले, 'लक्ष्मणने या कामासाठी उत्सुकता दाखवली आहे. वर्ल्ड कप दरम्यान लक्ष्मणने अहमदाबादला जाऊन बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. तो टीम इंडियाचा पुढील नवा हेड कोच होऊ शकतो. पुढील महिन्यात भारताच्या साऊथ आफ्रिका दौऱ्यावर तो हेड कोच म्हणून जाऊ शकतो, टीम इंडियाचे हेड कोच, म्हणून त्यांचा पहिला दौरा असेल.
advertisement
राहुल द्रविड टीम इंडियाचा हेड कोच असताना टीम इंडीयाने 2023 चा आशिया कप जिंकला आहे. यासोबतच काहीच दिवसांपूर्वी झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडीया फायनल पर्यंत पोहोचली होती परंतु दुर्दैवाने त्यांना ही मॅच जिंकता आली नाही. यासोबतच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका तसेच न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिकाही जिंकली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket News : राहुल द्रविड नंतर कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच? 'या' दिग्गज क्रिकेटरची होऊ शकते निवड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement