धोनीच्या रुममध्ये नेमकं काय होतं? हुक्का वादानंतर CSK च्या खेळाडूने 'सिक्रेट' फोडलं!

Last Updated:

भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण याने एमएस धोनीवर केलेल्या आरोपांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

धोनीच्या रुममध्ये नेमकं काय होतं? हुक्का वादानंतर CSK च्या खेळाडूने 'सिक्रेट' फोडलं!
धोनीच्या रुममध्ये नेमकं काय होतं? हुक्का वादानंतर CSK च्या खेळाडूने 'सिक्रेट' फोडलं!
मुंबई : भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण याने एमएस धोनीवर केलेल्या आरोपांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मला कुणाच्या खोलीमध्ये जाऊन हुक्का लावण्याची सवय नाही. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, असं इरफान पठाण टीममधून ड्रॉप करण्याच्या प्रश्नावर म्हणाला होता. इरफान पठाणचं हे वक्तव्य म्हणजे त्याने धोनीवर आरोप केल्याचं बोललं गेलं.
इरफान पठाणच्या हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर आता सीएसकेच्या खेळाडूने एमएस धोनीच्या रुममध्ये आलेल्या अनुभवाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. बेबी एबी म्हणून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविस आयपीएल 2025 मध्ये सीएसकेचा ट्रम्प कार्ड ठरला. 5 वेळा ट्रॉफी जिंकणारी सीएसके यंदाच्या मोसमात संघर्ष करत होती, पण गुर्जपनीत सिंगला दुखापत झाली आणि सीएसकेने ब्रेविसला बदली खेळाडू म्हणून टीममध्ये घेतलं.
advertisement
डेवाल्ड ब्रेविस सीएसकेमध्ये येताच त्याने धमाका केला. आरसीबीविरुद्ध (शून्य रनवर आऊट) ची कामगिरी वगळता उरलेल्या सामन्यांमध्ये ब्रेविसने उत्कृष्ट बॅटिंग केली. 22 वर्षांच्या डेवाल्ड ब्रेविसने 6 सामन्यांमध्ये 153 च्या स्ट्राईक रेटने 225 रन केल्या, यामध्ये 13 फोर आणि 17 सिक्सचा समावेश होता. ब्रेविसने आयपीएल 2025 मध्ये 2 अर्धशतकंही झळकावली.
सीएसकेसोबत खेळल्याचा अनुभव डेवाल्ड ब्रेविसने शेअर केला आहे. डेवाल्ड ब्रेविस हा एबी डिव्हिलियर्ससोबत युट्युबवर बोलत होता. 'सीएसकेसोबतचा माझा अनुभव अद्भूत आणि अविश्वसनीय आहे. एमएस धोनी हा अतिशय नम्र आहे. धोनीच्या रूमचं दार कायमच उघडं असायचं. धोनी झोपायचा तेव्हाच त्याच्या खोलीचं दार बंद असायचं. मी काही वेळा त्याच्या खोलीमध्ये जायचो आणि बसायचो. खोलीमध्ये तो त्याच्या छंदांबद्दल गप्पा मारायचा. क्रिकेट पाहायचा. धोनी खूप खास आहे', असं वक्तव्य डेवाल्ड ब्रेविसने केलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
धोनीच्या रुममध्ये नेमकं काय होतं? हुक्का वादानंतर CSK च्या खेळाडूने 'सिक्रेट' फोडलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement