Mumbai मध्ये लँड होताच हरमनप्रीतला चूक कळाली, मुंबईकर खेळाडूने एकहाती मॅच फिरवली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महिला वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळत आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करताना टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली आहे.
नवी मुंबई : महिला वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळत आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करताना टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली आहे. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर 329/2 एवढा झाला आहे. जेमिमा रॉडग्रीज 51 बॉलमध्ये नाबाद 69 रनवर खेळत आहे. याआधी कर्णधार हरमनप्रीतने मागच्या सामन्यात जेमिमाला डच्चू दिला होता, पण या सामन्यात संधी मिळताच मूळची मुंबईकर असलेल्या जेमिमाने धमाकेदार बॅटिंग केली आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर टीम इंडियाच्या दोन्ही ओपनरनी आक्रमक बॅटिंग केली. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने मोठ्या धावसंख्येकडे मजल मारली आहे. प्रतिका आणि स्मृती यांच्यात 212 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. प्रतिकाने 122 तर स्मृतीने 109 रनची खेळी केली.
टीम इंडियासाठी करो या मरो
advertisement
लागोपाठ 3 सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचं वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पोहोचणं कठीण झालं आहे, त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाला विजय गरजेचा आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन टीम आधीच सेमी फायनलला पोहोचल्या आहेत, तर एका टीमसाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धा आहे.
टीम इंडियाने 5 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला असून उरलेल्या 3 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे भारताच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत. दुसरीकडे न्यूझीलंडचा 5 पैकी एका सामन्यात विजय झाला, तर 2 सामने त्यांनी गमावले आणि 2 मॅच पावसामुळे रद्द झाल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तर टीम इंडिया सेमी फायनलला क्वालिफाय होणारी चौथी टीम ठरेल.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
October 23, 2025 7:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai मध्ये लँड होताच हरमनप्रीतला चूक कळाली, मुंबईकर खेळाडूने एकहाती मॅच फिरवली!


