WPL Auction: शमीपेक्षा 1 वर्षांनी मोठी, महिन्याभरापूर्वी निवृत्ती, ज्या वयात क्रिकेट सोडतात, त्या वयात पोरीने करोडो मोजायला भाग पाडलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला त्याच्या जास्तीच्या वयामुळे संघात संधी मिळाली नव्हती. पण आता त्याच्यापेक्षा एका वर्षाने मोठ्या असलेल्या खेळाडूला संधी मिळाली आहे.
खरं तर नवी दिल्लीत वुमेन्स प्रिमियर लीग 2026 च्या मिनी ऑक्शनला सूरूवात झाली आहे. या लिलावात मोहम्मद शमीपेक्षा एका वर्षाने मोठ्या असलेल्या न्युझीलंडच्या सोफी डिवाईनला संधी मिळाली आहे. सोफी डिवाईनने याच वर्षी वुमेन्स वर्ल्ड कप दरम्यान वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तिने शेवटचा वनडे सामनाह हा इंग्लंडविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. या सामन्यात तिला दोन्ही संघांकडून तिला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता.
advertisement
दरम्यान जरी सोफीने वनडेतून निवृत्तीची घोषणा केली असली तरी तिने टी20 क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच ती यंदाच्या वर्षी वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये खेळतानाही दिसणार आहे. आज या लीगसाठी मिनी ऑक्शन पार पडला होता.या ऑक्शनमध्ये तीची बेसप्राईज 50 लाख रूपये होती. पण तिला आता लिलावात 2 करोडच्या किमतीत गुजरात जाएटसने ताफ्यात घेतले आहे.त्यामुळे गुजरातची ताकद वाढणार आहे.
advertisement
सोफी डिवाईन अष्टपैलू खेळाडूसह पॉवर-हिटिंगसाठी आणि नेतृत्वासाठी ओळखली जाते.तिने एकदिवसीय सामन्यांमध्ये 4000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स घेणारी न्यूझीलंडची एकमेव खेळाडू आहे.तिच्या ताफ्यात येण्याने गुजरातची ताकद वाढणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 4:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL Auction: शमीपेक्षा 1 वर्षांनी मोठी, महिन्याभरापूर्वी निवृत्ती, ज्या वयात क्रिकेट सोडतात, त्या वयात पोरीने करोडो मोजायला भाग पाडलं


