भारताकडून वर्ल्ड कप हिसकावायला निघालेली, आता लिलावात कोटीची बोली, पण कर्णधारपदावर पाणी सोडावं लागणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
साऊथ आफ्रिकेच्या त्या कर्णधारावर देखील लॉटरी लागली होती,जिने भारताकडून वुमेन्स वर्ल्ड कप हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या खेळाडूला कोणत्या संघाने ताफ्यात घेतलं आहे.
WPL Auction 2026 : वुमेन्स प्रिमियर लीगच्या मेगा लिलावाला आज नवी दिल्लीत सूरूवात झाली आहे. या लिलावात आतापर्यंत अनेक खेळाडूंवर बोली लागली आहे. या लिलावात साऊथ आफ्रिकेच्या त्या कर्णधारावर देखील लॉटरी लागली होती,जिने भारताकडून वुमेन्स वर्ल्ड कप हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या खेळाडूला कोणत्या संघाने ताफ्यात घेतलं आहे. तसेच तिच्यावर कितीची बोली लागली आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर ही खेळाडू दुसरी तिसरी कुणी नसून साऊथ आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्व्हार्ड होती. वुमेन्स वर्ल्डकपमध्ये साऊथ आफ्रिका आणि भारत या दोन संघात फायनलचा सामना रंगला होता. या सामन्यात भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेचा डाव गडगडला होता. पण साऊथ आफ्रिकेची कर्णघार लॉरा वोल्व्हार्डने एकाकी झुंज देत शतकीय खेळी केली होती.पण या शतकानंतरही तिला साऊथ आफ्रिकेला फायनल सामना जिंकवता आला नव्हता. आणि भारताने फायनलचा सामना जिंकून इतिहास रचला होता.
advertisement
Laura Wolvaardt as Delhi Capitals captain?
Parth Jindal: “No, no. We are very clear that we will have a Indian captain” pic.twitter.com/hv2QEPg3sl
— Sahil Malhotra (@Sahil_Malhotra1) November 27, 2025
दरम्यान ही लॉरा वॉल्व्हॉर्ट आता वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. या लिलावात 1.1 कोटी रूपयाच्या किमतीली दिल्ली कॅपिटल्सने तिला ताफ्यात घेतलं आहे.त्यामुळे आता दिल्लीकडून ती खेळताना दिसणार आहे. दरम्यान साऊथ आफ्रिकेची ही कर्णधाल दिल्ली कॅपिटल्समध्ये आल्याने ती कर्णधारपदी येईल अशी चर्चा होती. यावर दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी नाही, आमचं ठरलं आहे भारतीय कर्णधारच असणार असे सांगून टाकले.त्यामुळे 1.1 कोटीची बोली लागून देखील तिला कर्णधार पदावर पाणी सोडावं लागणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 6:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारताकडून वर्ल्ड कप हिसकावायला निघालेली, आता लिलावात कोटीची बोली, पण कर्णधारपदावर पाणी सोडावं लागणार


