कोल्हापूरच्या इंजिनीअरचा नाद खुळा! शेतकऱ्यांच्या साथीने थेट त्रिपुरात सुरू केला व्यवसाय, आता करतोय 140 कोटींची कमाई

Last Updated:

Success Story :  तुमच्या मनामध्ये जिद्ध आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. याचं उत्तम उदाहरण ठरला आहे. तो म्हणजे कोल्हापूरचा युवा उद्योजक.

success story
success story
मुंबई : तुमच्या मनामध्ये जिद्ध आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. याचं उत्तम उदाहरण ठरला आहे. तो म्हणजे कोल्हापूरचा युवा उद्योजक. त्यानं इतर लोकांसासारखे शिक्षण घेत नोकरी न करता व्यवसाय करण्याचा घेतला. आणि त्यात यशस्वी झाला आहे. चला तर मग जाणून घेऊ त्याची यशोगाथा..
advertisement
थेट त्रिपुरात सुरू केला फळ-भाजी प्रक्रिया उद्योग
अद्वैत कुलकर्णी असं या तरुणाचे नाव असून तो मुळचा कोल्हापूरचा रहिवाशी आहे. अद्वैतने मॅकेनिकल इंजिनीअर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता वेगळी वाट निवडली. आणि त्रिपुरा राज्यात फळ-भाजी प्रक्रिया उद्योग उभारला. त्यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून अननस, मका (बेबीकॉर्न) आणि बांबू कोंब या पिकांना आता खात्रीशीर बाजारपेठ मिळू लागली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासोबतच त्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
advertisement
2019 मध्ये घेतला निर्णय
2019 मध्ये त्रिपुरा सहलीदरम्यान तेथील अननस उत्पादन पाहून प्रभावित झाले. राज्यात मोठ्या प्रमाणावर अननस पिकवला जात असला तरी त्यावर प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याची खंत त्यांना वाटली. कोल्हापुरात परतल्यानंतर त्यांनी वडील नरेंद्र कुलकर्णी आणि इचलकरंजीतील शेतीमाल प्रक्रिया उद्योजक सुनील काळे यांच्यासोबत चर्चा करून त्रिपुरात प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
तिघांनी प्रत्यक्ष त्रिपुराला भेट देऊन अननस उत्पादनाचा अभ्यास केला. कोणत्या प्रकारचे प्रक्रिया उत्पादन तयार करता येईल, बाजारपेठ कशी उभारता येईल आणि प्रकल्प आर्थिकदृष्ट्या टिकाऊ कसा राहील याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यानुसार ऑक्टोबर 2019 मध्ये प्रकल्प सुरू करण्याचे निश्चित झाले. मात्र, कोरोनामुळे योजना पुढे ढकलावी लागली. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर त्यांनी पुन्हा त्रिपुराला भेट दिली आणि कुमारघाट परिसरातील बंद पडलेला प्रक्रिया उद्योग भाड्याने घेऊन 2022 मध्ये 'नूनसेई फळभाजी प्रक्रिया उद्योग' सुरु केला.
advertisement
140 कोटींची उलाढाल
कुलकर्णी यांच्या या उद्योगाने 3 ते 4 वर्षात मोठी ऊंची गाठली. दरवर्षी सुमारे 150 टन अननसावर प्रक्रिया करून 70 लाखांची तसेच बेबीकॉर्न अंदाजे 100 टनावर प्रक्रिया करून 50 लाखांची तर 25 टन बांबू कोबावर प्रक्रिया 20 लाख अशी मिळून 140 कोटींची उलाढाल करत आहे. सर्व उत्पादने देशातील विविध बाजारपेठांत डबाबंद स्वरूपात विकली जातात. गुणवत्तेमुळे त्यांना सातत्याने चांगली मागणी मिळते आहे.
advertisement
शेतकऱ्यांना नवी बाजारपेठ
पूर्वी अननस व बेबीकॉर्न उत्पादकांना बाजारपेठेअभावी त्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळत नव्हता. अनेकदा खराब झालेल्या मालामुळे नुकसानही सहन करावे लागत होते. पण कुलकर्णी यांच्या प्रक्रियाउद्योगामुळे शेतकऱ्यांना थेट खरेदीची सुविधा मिळू लागली. स्थिर भाव, हमी बाजार आणि नियमित पेमेंट यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना वाढली आहे.
advertisement
उद्योग विस्ताराची योजना
सध्या उद्योग स्थिरावला असून अद्वैत कुलकर्णी आता पुढील टप्प्यात इतर स्थानिक पिकांवरही प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहेत. प्रक्रियायुक्त उत्पादनांची विविधता वाढवून नवीन बाजारपेठा उभारण्याचे काम सुरू आहे. "शेतकऱ्यांना खात्रीशीर बाजार मिळावा आणि त्यांच्या उत्पादनांचे खरे मूल्य मिळावे, हा या उद्योगामागील मुख्य हेतू आहे." असे अद्वैत कुलकर्णी सांगतात.
view comments
मराठी बातम्या/Success Story/
कोल्हापूरच्या इंजिनीअरचा नाद खुळा! शेतकऱ्यांच्या साथीने थेट त्रिपुरात सुरू केला व्यवसाय, आता करतोय 140 कोटींची कमाई
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: चांदीनं गाठला रेकोर्डब्रेक दर, सोनं किती रुपयांनी महागलं? पटापट चेक करा आजचा दर
चांदीनं गाठला रेकोर्डब्रेक दर, सोनं किती रुपयांनी महागलं? आजचा दर काय?
  • चांदीनं गाठला रेकोर्डब्रेक दर, सोनं किती रुपयांनी महागलं? आजचा दर काय?

  • चांदीनं गाठला रेकोर्डब्रेक दर, सोनं किती रुपयांनी महागलं? आजचा दर काय?

  • चांदीनं गाठला रेकोर्डब्रेक दर, सोनं किती रुपयांनी महागलं? आजचा दर काय?

View All
advertisement