Success Story: वडिलांच्या व्यसनानं पैसे गेले, आईसोबत केली मोलमजुरी, मेळघाटातील PSI अरुण नागरगोजे यांच्या संघर्षाची कहाणी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Success Story: वडिलांना व्यसन, घरात पैसे टिकायचा नाही, 4 भावंड घरात हालाकीची स्थिती, मेळघाटातील अरुण नागरगोजे कसे बनले PSI, वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी
जिथे मूलभूत सुविधांची वाणवा, तिथे शिक्षणाचे स्वप्न पाहणे म्हणजे एक मोठा संघर्षच असतो. अरुण दशरथ नागरगोजे, मेळघाटातील एका दुर्गम भागातील तरुण. शेतमजुरी, बांधकाम क्षेत्रातील मजुरी, ट्रक कंडक्टर आणि शिक्षक अशी अनेक खडतर वळणे घेतलेल्या अरुण यांनी नुकतीच महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड होऊन आपल्या संघर्षाला यशाचे शिखर गाठले आहे.
आईच्या एका शब्दाने मिळाली शिक्षणाची प्रेरणा
अरुण यांच्या प्रवासाची सुरुवात अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत झाली. घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेक तरुणांप्रमाणे त्यांनाही शिक्षण अर्धवट सोडून शेतमजुरी करावी लागली. पण त्यांच्या जीवनात सर्वात मोठे योगदान त्यांच्या आईचे राहिले. अरुण सर सांगतात की, त्यांच्या आईला '१५ वी पर्यंत शिकवायचं' होतं. त्यांना नेमके नियम माहीत नव्हते, पण या एका शब्दानेच त्यांच्या मनात शिक्षणाची ज्योत पेटवली.
advertisement
मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांचे शिक्षण सुरू झाले. एकदा आईला मजुरीला जाता यावे म्हणून आईने त्यांना मोठ्या भावासोबत शाळेत पाठवले आणि तिथे भावाने त्यांचं ॲडमिशन केले. शिक्षणाचा हा प्रवास त्यांनी कठीण परिस्थितीतही सुरू ठेवला. त्यांचं गाव स्थलांतरीत झालं होतं. तीन बहिणींचं शिक्षण फक्त माझ्यामुळे केलं नाही. कारण मुलाने शिकावं असं तिला वाटत होतं.
advertisement
मेळघाटातून पुण्यापर्यंतचा खडतर प्रवास
शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची कामे केली. ते शेत मजूर म्हणून काम करत होते. त्यांनी बांधकाम क्षेत्रात मजुरी केली. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना ट्रक कंडक्टर म्हणूनही काम करावे लागले. याशिवाय, त्यांनी काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले. या सर्व संघर्षातून त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. घरची परिस्थिती हालाकीची होती. वडिलांना व्यसन असल्यामुळे घरात पैसा टिकायचा नाही.
advertisement
मोलमजुरी करुन केलं शिक्षण
वडिलांच्या व्यसनामुळे आम्ही चार भाऊ कधीच एकत्र राहिलो नाही. घरात पैसा नव्हता, त्यामुळे चौघंही आम्ही भाऊ वेगवेगळ्या लोकांकडे कुणी मित्रांकडे कुणी दुसऱ्या सरांकडे राहाचो. मला सातवीत आईनं एक वाक्य म्हटलेलं आठवत होतं, शिक्षण करायचंच आहे पण पैसे खूप लागतोय, तेव्हा मला जाणीव झाली की आपलं शिक्षण आपल्याला करायचं. आईसोबत मजुरी करायला सुरुवात केली. गव्हाच्या सऱ्या पाडणे, तलावातून गाळ काढण्यासारखी कामं केली. मेस्त्री वर्गासोबत घर बांधण्याचंही काम केलं. शनिवारी रविवार मजुरी करायची आणि उरलेले दिवस शाळा करायची.
advertisement
रिझल्ट लागला आणि मनावरचं ओझं हलकं झालं
प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर पीएसआय परीक्षेचा निकाल लागला. निकाल पाहतानाचा अनुभव सांगताना अरुण सर म्हणाले, "ज्या दिवशी रिझल्ट लागला तो सोमवार होता. सोमवारी सहसा आयोगाचा रिझल्ट नसतो. त्यामुळे मी थोडा निवांत होतो. पण लिस्ट पाहिली आणि त्यामध्ये माझे नाव तिसऱ्या क्रमांकावर दिसले, तेव्हा मला खूप आनंद झाला. 'एकदाच जे एकदम रिकामं झालं' संपूर्ण ताण, कष्ट दूर संपले असं त्या क्षणी मनात भावना आली."
advertisement
मेळघाटातील पहिला पीएसआय
view commentsअरुण नागरगोजे यांची ही निवड त्यांच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण मेळघाटासाठी एक मोठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या यशाबद्दल सध्या त्यांच्या १५ ते २० गावांमध्ये जोरदार सेलिब्रेशन केलं. धारणी तालुक्यातील १५६ गावांच्या मेळघाट परिसरातून पहिले PSI असतील, अशी चर्चा झाली. अरुण सर सांगतात की, त्यांना मिळालेले हे पद मोठे आहे, पण त्यांचे खरे ध्येय अजूनही मोठे आहे. शिक्षण आणि शिक्षकांविषयी चांगली जाणीव निर्माण करून मेळघाटमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. शेतमजूर, कंडक्टर ते थेट पोलीस उपनिरीक्षक असा प्रवास करणारे अरुण नागरगोजे हे आजच्या पिढीसाठी जिद्द आणि आत्मविश्वासाचे एक मोठे उदाहरण आहेत.
Location :
Maharashtra
First Published :
November 01, 2025 8:49 AM IST
मराठी बातम्या/Success Story/
Success Story: वडिलांच्या व्यसनानं पैसे गेले, आईसोबत केली मोलमजुरी, मेळघाटातील PSI अरुण नागरगोजे यांच्या संघर्षाची कहाणी


