'साडी नेसवून ही काय कमवणार', लोकांचे टोमणे, सासूची अट, 7वी पास डॉली जैन कशा बनल्या 'साडी ड्रेपिंग क्वीन'
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डॉली जैन यांनी 357 प्रकारे साडी नेसण्याची कला विकसित केली, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवलं आणि सेलिब्रिटींसाठी खास साडी ड्रेपिंग करत फॅशन विश्वात मोठं स्थान मिळवलं.
मुंबई: आजकाल रेडी टू वेअर साड्या मार्केटमध्ये येत आहे. मात्र त्यांना टक्कर देण्यासाठी सहावारी आणि नऊवारी साडीमध्ये देखील वेगवेगळे ट्रेन्ड फॅशन स्टाइल करुन नेसण्याचा आजकाल कल तरुण पिढीकडे जास्त आहे. कधीकाळी नकोशी वाटणारी साडी आज वेगवेगळ्या पद्धतीने नेसून ती ट्रेण्ड म्हणून सोशल मीडियावर मिरवताना तरुणी दिसत आहेत. सेलिब्रिटींना फॉलो करत आहेत. आता एक साडी 357 वेगवेगळ्या पद्धतीनं नेसता येते असं कोणी सांगितलं तर विश्वास बसेल का? नाही ना? पण ते साध्य करुन दाखवलं डॉली जैन यांनी. त्यांना साडी ड्रेपिंग क्वीन असंही म्हटलं जातं.
डॉली जैन आज सेलिब्रेटिंगमधील मोठं नाव आहे. अनेक सेलिब्रेटींना त्या साडी नेसवतात, तेही वेगवेगळ्या स्टाइलने, सेलिब्रेटी देखील त्यांच्या या कौशल्याचं कौतुक करण्यात कुठे मागे राहिले नाहीत. डॉली जैन यांचा एका पिनेपासून साडी नेसवण्यापर्यंत सुरू झालेला प्रवास खूप कठीण होता. सातवी पास शिकूनही आज त्या उत्तम इंग्रजी, हिंदी बोलून आपली कला जगभरात दाखवत आहेत. डॉली जैन यांनी साडी नेसण्याला फक्त एक कला म्हणून नाही तर प्रोफेशन म्हणून पाहिलं.
advertisement
काही कारणांमुळे डॉली जैन यांचं शिक्षण अर्धवट राहीलं. सातवीच्या पहिल्या टर्मची परीक्षा दिल्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही. वयाच्या 21 व्या वर्षी कुटुंबियांनी लग्न करुन दिलं. गृहप्रवेशादरम्यान सासूने रोज साडीच नेसायची असा आदेश दिला. डॉली जैन यांना साडी नेसायचा खूप राग यायचा, मात्र रोज साडी नेसायची म्हटल्यावर केलं पाहिजे, रोज नेसायला 45-50 मिनिटं लागायचे. मग हळूहळू सवय झाली, पण एकाच स्टाइलने साडी काय नेसायची, असंही त्यांना वाटलं.
advertisement
डॉली यांनी वेगवेगळ्या स्टाइलने साडी नेसायला सुरुवात केली. त्यांनी याला प्रोफेशन करायचं ठरवलं. ज्या साडीचा राग यायचा त्याच साडीवर हळूहळू प्रेम होऊ प्रेम होऊ लागलं. साडी नेसवण्याच्या कलेला व्यवसाय बनवून, प्रत्येक साडी ड्रेपिंगसाठी हजारो ते लाखो रुपये घेणाऱ्या डॉली जैन आज फॅशन जगतात एक मोठं नाव बनल्या आहेत. मूळच्या बंगळुरूच्या असलेल्या डॉली जैन लग्नानंतर कोलकाता इथे आल्या. सध्या डॉली जैन भारतीय फॅशन विश्वातील एक मोठं नाव आहे. त्यांचे व्हिडीओ पाहून अनेक तरुणी, महिला साडी नेसायला शिकतात.
advertisement
सेलिब्रिटींना खास साडी नेसवण्यासाठी त्या मोठी रक्कम घेतात. नुकत्याच झालेल्या राधिका मर्चंटच्या लग्नात राधिकापासून ते अंबानी कुटुंबातील इतर महिलांच्या साड्याही त्यांनीच ड्रेप केल्या होत्या.
जेव्हा डॉली यांचे लग्न झाले, तेव्हा त्या फक्त 21 र्षांच्या होत्या आणि त्यांचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झाले होते. लग्नानंतर सासरी गेल्यावर त्यांच्या सासूने त्यांच्यासमोर एक अट ठेवली. ती अट म्हणजे, त्यांनी फक्त साडीच नेसावी लागले. सासूबाईंची ही अट ऐकून डॉली खूप रडल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांनी पहिल्यांदा साडी तेव्हा नेसली, जेव्हा त्यांचे पती आणि सासरचे लोक त्यांना लग्नाआधी पाहण्यासाठी आले होते.
advertisement
त्या दिवसापासून आजपर्यंत डॉली नेहमी साडी नेसतात. सुरुवातीला त्यांना साडी नेसणे आवडत नव्हते, पण नंतर त्यांनी ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनवले. डॉली जैन यांना 357 वेगवेगळ्या प्रकारे साडी नेसता येते. यात हैदराबादी, गुजराती, राजस्थानी आणि आसामी साड्यांच्या शैलीचा समावेश आहे. 2019 साली सर्वात वेगानं साडी नेसवण्यासाठी त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंदवले गेले. डॉली जैन यांनी फक्त 18.5 सेकंदात साडी नेसून हा विश्वविक्रम केला होता.
advertisement
या कलेला त्यांनी आपला व्यवसाय बनवला आणि आज त्या त्यांच्या खास आणि अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जातात, सुरुवातीला त्यांचा हा व्यवसाय अनेकांना हास्यास्पद वाटला. यात काय पैसे मिळणार? असे टोमणेही त्यांना ऐकावे लागले. पण लग्नानंतर साडी नेसण्याची सवय आणि नंतर या कलेबद्दल वाढलेली आवड यामुळे त्यांनी यालाच आपलं करिअर म्हणून पाहिलं आणि त्याच बोलणाऱ्या लोकांची तोंडं बंद केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 1:54 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
'साडी नेसवून ही काय कमवणार', लोकांचे टोमणे, सासूची अट, 7वी पास डॉली जैन कशा बनल्या 'साडी ड्रेपिंग क्वीन'