ज्या हॉस्पिटलमध्ये आईला गमावलं, त्याच ठिकाणचे झाले 'डीन', डॉ. नवनीत सक्सेना यांची Success Story प्रत्येकाला प्रेरणा देणारी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डॉ. नवनीत सक्सेना यांनी जबलपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजचे डीन बनून आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले, त्यांच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायक आहे.
ही गोष्ट आहे एका अशा मुलाची, ज्याने आयुष्यात मोठं यश मिळवलं, पण आज पाहायला मात्र त्याची आई त्याच्यासोबत नाही. शब्बासकीची थाप द्यायला सोबत नाही, मात्र तिचे आशीर्वाद सदैव आहेत. त्याचच फलित म्हणून आज मुलाने हे शक्य करुन दाखवलं. ज्या आईने त्याला हे स्वप्न पाहायला शिकवले, ती आज हे यश पाहण्यासाठी नाही. ही कहाणी जितकी प्रेरणादायक आहे, तितकीच भावूक करणारीही आहे.
जबलपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. नवनीत सक्सेना हे आजच्या तरुणाईसाठी एक मोठे उदाहरण आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे, डॉ. नवनीत ज्या मेडिकल कॉलेजमध्ये आज डीन म्हणून काम करत आहेत, कधीकाळी त्याच कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आईचे निधन झालं होतं.
आईला गमावल्याचं दु:ख मानत आजही कायम
डॉ. नवनीत यांच्या आईला कॅन्सर झाला होता आणि त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. त्यावेळी नवनीत डॉक्टर नव्हते, फक्त एक मुलगा होते. हॉस्पिटलमध्ये आईसोबत असताना ते त्यांच्या पलंगाच्या शेजारी जमिनीवर झोपायचे. जेव्हा त्यांची आई आयसीयूमध्ये होती, तेव्हा या मुलाने त्याच हॉस्पिटलमध्ये राहून त्यांची सेवा केली. आज, नियतीने त्यांना त्याच मेडिकल कॉलेजचे डीन बनवले आहे. डॉ. नवनीत आजही सांगतात की, "आजही जेव्हा मी आयसीयूच्या बाजूने जातो, तेव्हा मला आईची आठवण येते आणि मी भावूक होतो."
advertisement
१६ व्या वर्षीच पास केली होती परीक्षा
डॉ. नवनीत सक्सेना यांनी लोकल १८ शी बोलताना सांगितले की, लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. बारावी परीक्षा पास झाल्यावर त्यांनी प्री-मेडिकल टेस्ट (PMT) म्हणजेच वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी कोणतेही कोचिंग न घेता ही परीक्षा पास केली होती आणि २५० वी रँक मिळवली होती. मात्र, वयाच्या १६ व्या वर्षी उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना कमी वयामुळे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा पीएमटी दिली आणि यावेळी टॉप-१०० मध्ये रँक मिळवून एमबीबीएसला प्रवेश घेतला.
advertisement
आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण
डॉ. नवनीत यांनी सांगितले की, त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई-वडील दोघांचेही स्वप्न होते की आपण डॉक्टर बनावे. त्यामुळेच त्यांनी वैद्यकीय क्षेत्र निवडले. शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. नवनीत एक कुशल नेत्ररोग विशेषज्ञ बनले आणि नंतर मेडिकल कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम करू लागले. शिक्षण आणि कामातील समर्पण पाहून आता ते त्याच मेडिकल कॉलेजचे डीन बनले आहेत. डॉ. नवनीत सक्सेना हे मूळचे इंदूरचे असून, त्यांचे एमबीबीएस आणि नेत्ररोगमधील पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण इंदूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये झाले आहे.
advertisement
डॉ. नवनीत सक्सेना यांचा तरुणांना मोलाचा संदेश
view commentsडॉ. नवनीत सक्सेना यांनी आजच्या तरुणांना मोलाचा संदेश दिला आहे. ते म्हणाले, "जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत तरुणांनी त्या लक्ष्याच्या मागे धावले पाहिजे आणि तुमच्या आवडीलाच आपले प्रोफेशन बनवा." माझ्या जीवनातील सर्वात जवळची आणि मोठी गोष्ट मी गमावली. मी आईला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण, आज त्याच कॉलेजमध्ये जेव्हा मी आयसीयूच्या बाजूने जातो, तेव्हा भावूक होतो. मात्र, आता डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करणे हाच माझा पहिला धर्म आणि कर्तव्य आहे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 2:27 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
ज्या हॉस्पिटलमध्ये आईला गमावलं, त्याच ठिकाणचे झाले 'डीन', डॉ. नवनीत सक्सेना यांची Success Story प्रत्येकाला प्रेरणा देणारी