MPSC Success Story: वडील शेतकरी, आईनं दागिने मोडले, पोरीनं कष्टाचं जीच केलं, सांगलीची गौरी राज्यात मुलींमध्ये तिसरी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गौरी मारुती कदम, महादेववाडी सांगली येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी, MPSC परीक्षेत मुलींमध्ये राज्यात तिसरी आली. तिच्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम.
महाराष्ट्राच्या मातीतील जिद्द आणि चिकाटी किती मोठी आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आज सांगली जिल्ह्यातील महादेववाडी पाहायला मिळालं. एरवी मुलगी नको म्हणणाऱ्यांना तर ही चांगलीच चपराक आहे. सांगलीच्या गौरी मारुती कदम हिने आपल्या जिद्दीच्या जोरावर आई वडिलांचं नाव मोठं केलं. वडील अल्पभूधारक शेतकरी असूनही, घरची हलाखीची परिस्थिती, टोमणे आणि आर्थिक चणचण यावर मात करत गौरीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. ग्रामीण भागातून, घरी राहून केवळ स्वतःच्या अभ्यासाच्या बळावर तिने मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे.
डोक्यावर कर्ज तरी हरली नाही गौरी!
महादेववाडी इथे शेतकरी कुटुंबातून आलेल्या गौरीचा प्रवास अत्यंत खडतर होता. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून तिचे वडील मारुती कदम हे इस्लामपूर एमआयडीसीमध्ये कामाला जात. घराची आर्थिक बाजू सांभाळताना मुलीला शिक्षणात काही कमी पडू नये, म्हणून आई नीलम कदम यांनी आपले दागिने मोडले. समाजाने टोमणे मारले, "एवढा खर्च कशाला करताय? शेवटी ती सासरी जाणार," पण आई-वडिलांनी मुलगा-मुलगी असा कोणताही भेदभाव केला नाही. लहानपणापासून तिला अधिकारी होण्याची इच्छा होती. तिची हीच इच्छा तीने पूर्ण केली. गौरीला डॉक्टर बनण्याची वडिलांची इच्छा पूर्ण झाली नसली तरी, तिने पहिल्याच प्रयत्नात सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पद मिळवलं.
advertisement
अपयश झटकले, ध्येय साधले
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून वनस्पती शास्त्रात ९१% गुणांनी पदवी पूर्ण करून गौरीचा आत्मविश्वास वाढला होता. २०२० मध्ये तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली, पण त्यात अपयश आले. तरीही ती डगमगली नाही. पुण्याचा महिन्याचा १०-१५ हजार रुपयांचा खर्च परवडणारा नव्हता, म्हणून ती गावी परतली आणि घरी राहूनच MPSC वर लक्ष केंद्रित केले. घरात लग्नाची चर्चा सुरू झाल्याने दडपण होतंय तिने ऑगस्ट २०२४ मध्ये MPSC परीक्षा दिली आणि दुसऱ्याच प्रयत्नात ९६ व्या रँकसह मुलींमध्ये राज्यात तिसरे स्थान मिळवले. आर्थिक परिस्थितीने चिडचिड व्हायची, तरीही मुलीला कमी पडू दिले नाही.
advertisement
सोशल मीडियापासून दूर, GDC ॲकॅडमीची मिळाली मदत
गौरीने यशाचा मंत्र सांगताना शिस्तबद्ध अभ्यासाचे महत्त्व सांगितले. गेल्या तीन वर्षांत तिने सोशल मीडियापासून जाणीवपूर्वक दूर राहून मोबाईलचा वापर टाळला. दररोज १० तास अभ्यास, वर्तमानपत्रांचे सखोल वाचन आणि नोट्स काढण्यावर तिचा भर होता. Human Resource विषय थोडा अवघड वाटला, पण सातत्याने प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, GDC ॲकॅडमीचे गणेश सरांचे मोफत YouTube वरील मार्गदर्शन व्हिडिओ आणि मोटिवेशनल लेक्चर्सचा तिला अभ्यासाची दिशा ठरवण्यास मोठा फायदा झाला. ताण कमी करण्यासाठी तिने ध्यान केलं.
advertisement
Plan B तयार ठेवा! ग्रामीण तरुणांना मोलाचा सल्ला
view commentsग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गौरीचा सल्ला महत्त्वाचा आहे. ती म्हणते, "परिस्थिती कशीही असो, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये. इंग्रजी भाषेची अडचण येते, पण त्यासाठी तयारी करावी." UPSC मध्ये अपयश आल्यावर निराशा न येण्यासाठी तिने आपला 'बी प्लॅन' (B Plan) तयार ठेवला आणि ती MPSC कडे वळली. ती सांगते, "जर तुमचा 'बी प्लॅन' तयार असेल, तर अपयशाचे दडपण येत नाही."
Location :
Maharashtra
First Published :
November 08, 2025 1:38 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
MPSC Success Story: वडील शेतकरी, आईनं दागिने मोडले, पोरीनं कष्टाचं जीच केलं, सांगलीची गौरी राज्यात मुलींमध्ये तिसरी


