PSI Success Story: आईनं ऑपरेशनचे पैसे पोराच्या शिक्षणाला दिले, पठ्ठ्यानं त्यागाचं सोनं केलं, भावुक करणार VIDEO

Last Updated:

PSI पद मिळवलेल्या तरुणाने आईच्या त्यागामुळे यश मिळवलं, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लाखो व्ह्यू आणि लाईक्स मिळाले आहेत.

News18
News18
आई ही आईच असते, ती कधीच आपल्या पिल्लांना वाऱ्यावर सोडत नाही, याची पुन्हा एकदा प्रचीती पाहायला मिळाली. आईला त्रास होत असतानाही पोरासाठी तिने तोंडाला पदर लावून यातना सहन केल्या. रडत रात्र घालवली, त्रास होत असतानाही तिने सगळा फक्त पोरासाठी सहन केला, ऑपरेशनचा खर्चा तिने मुलाच्या शैक्षणिक तयारीला लावला आणि त्याचं पठ्ठ्यानं चीज केलं आहे. मुलाने PSI ची पोस्ट मिळवून दाखवली.
PSI झालेल्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत आहे. ही वाट जरी वळणाची बळ येऊदे हिमतीला..! झुंझार होऊनी ललकार आसमनाला..! लाऊनी कपाळी माती.. झेप घे क्षितिजा पाठी हुंकार भरारीसाठी पेटुदे मनाच्या वाती..! हे शब्द या तरुणाने प्रत्यक्षात खरे करुन दाखवले आहेत. PSI तरुणाला हे सांगताना अक्षर: रडू कोसळत होतं. आईनं सोसलेला त्रास तो प्रसंग सगळा अंगावर येणारा होता. ती आई होती तिने लेकरासाठी त्याग केला त्याचं जीच या PSI तरुणाने केले आहे.
advertisement
या PSI तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने नेमकं काय घडलं ते सांगितलं, माझ्या आईचा एक पाय मोडला होता. तिला प्रचंड त्रास होत होता, ऑपरेशन करावं लागणार होतं, त्यासाठी पैसे न देता तिने माझ्यासाठी पैसे दिले. ती रडत त्रास सहन करत होती माझ्यासाठी ती लढत राहिली. तिने माझ्या स्पर्धा परीक्षांसाठी पैसे दिले आणि त्याच प्रयत्नात PSI मध्ये मला यश आलं. आईचे आशीर्वाद खूप मोलाचे असतात.
advertisement
advertisement
advertisement
View this post on Instagram
advertisement
advertisement
view comments
मराठी बातम्या/Success Story/
PSI Success Story: आईनं ऑपरेशनचे पैसे पोराच्या शिक्षणाला दिले, पठ्ठ्यानं त्यागाचं सोनं केलं, भावुक करणार VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement