Fridge : तुमच्या फ्रिजमधून तर येत नाही ना असा आवाज? वेळीच सावध व्हा, नाहीतर स्वत:चं मोठं नुकसान करुन घ्याल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
वेळेवर या आवाजांना ओळखल्यास तुम्ही हजारो रुपयांच्या नुकसानीपासून वाचू शकता. चला, तर मग जाणून घेऊया, फ्रिजमधून येणारे कोणते आवाज सामान्य आहेत आणि कोणते आवाज तुम्हाला लगेच मेकॅनिकला बोलावण्याचा इशारा देत आहेत.
गृहिणींचा घरातील विश्वासू 'इलेक्ट्रॉनिक मित्र' कोण असेल, तर तो आहे आपला फ्रिज. चोवीस तास न थकता हे उपकरण आपले अन्न आणि पेये ताजे ठेवत असतं. दिवसरात्र चालत असल्यामुळे, फ्रिजमधून कधीकधी हलके-फुलके आवाज येणे हे अगदी सामान्य आहे. पण, अनेकदा आपण या आवाजांकडे दुर्लक्ष करतो आणि चालू आहे, म्हणजे आवाज येणारच असं म्हणून सोडून देतो. मात्र, काहीवेळा हेच छोटे आवाज तुमच्या फ्रिजमधील एखाद्या गंभीर बिघाडाची सुरुवात असू शकतात.

वेळेवर या आवाजांना ओळखल्यास तुम्ही हजारो रुपयांच्या नुकसानीपासून वाचू शकता. चला, तर मग जाणून घेऊया, फ्रिजमधून येणारे कोणते आवाज सामान्य आहेत आणि कोणते आवाज तुम्हाला लगेच मेकॅनिकला बोलावण्याचा इशारा देत आहेत.
advertisement

सामान्य आणि नैसर्गिक आवाज
हे आवाज ऐकून घाबरण्याची गरज नाही, कारण ते फ्रिजच्या नैसर्गिक कार्याचा भाग आहेत

1. 'टक-टक' किंवा क्रॅकिंगचा आवाज: थंडी-गरमीचा खेळ
advertisement
जेव्हा तुम्ही फ्रिजचा दरवाजा उघडता-बंद करता किंवा डीफ्रॉस्टिंग होते, तेव्हा फ्रिजच्या आतल्या प्लास्टिक आणि मेटलचे भाग तापमानातील बदलामुळे प्रसरण पावतात किंवा आकुंचन पावतात. यामुळे 'टक-टक' किंवा 'क्रॅक' (Cracking) असा आवाज येतो. जोपर्यंत फ्रिज व्यवस्थित थंड करत आहे, तोपर्यंत हे आवाज चिंता करण्यासारखे नाहीत.

2. आइस मेकर
advertisement
ज्या फ्रिजमध्ये ऑटोमॅटिक आइस मेकर (Automatic Ice Maker) असतो, तिथे ठराविक वेळेनंतर बर्फ तयार होऊन कंटेनरमध्ये पडतो. तेव्हा एक हलका 'धप्प' असा आवाज येतो. त्यानंतर पाणी भरण्यासाठी जेव्हा वॉल्व्ह उघडतो, तेव्हा काही सेकंदांसाठी बारीक 'गुरगुरणारा आवाज' ऐकू येते. हा संपूर्ण चक्र दर काही तासांनी पूर्ण होतो आणि तो पूर्णपणे सामान्य आहे.
advertisement

3. डीफ्रॉस्ट मोडमधील 'गप्पा'
advertisement
फ्रिज जेव्हा डीफ्रॉस्ट सायकलमध्ये जातो, तेव्हा आत जमलेला बर्फ वितळायला लागतो आणि हीटरवर पडतो. यामुळे 'चट-चट' किंवा 'सिस-सिस' (Hissing) असे आवाज येतात. वितळलेले पाणी ड्रेन पाईपमधून वाहताना 'गळगळाट' किंवा 'बुडबुड्यां'चा आवाज देखील येऊ शकतो. ही डीफ्रॉस्टिंगची प्रक्रिया आहे आणि आवाज सामान्य आहेत.

धोक्याची घंटा वाजवणारे आवाज (Warning Sounds)
advertisement
हे आवाज ऐकू आल्यास लगेच लक्ष द्या, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
[caption id="attachment_1556772" align="alignnone" width="1200"]
संकेत: हा बिघाड लवकर दुरुस्त न केल्यास कंप्रेसर पूर्णपणे खराब होऊ शकतो आणि फ्रिज दुरुस्त करण्याऐवजी नवीन घेणे अधिक सोयीचे ठरू शकते. त्वरित मेकॅनिकला बोलवा." width="1200" height="900" /> 1. कंप्रेसरची जोरदार 'धड-धड' आवाज
संकेत: हा बिघाड लवकर दुरुस्त न केल्यास कंप्रेसर पूर्णपणे खराब होऊ शकतो आणि फ्रिज दुरुस्त करण्याऐवजी नवीन घेणे अधिक सोयीचे ठरू शकते. त्वरित मेकॅनिकला बोलवा." width="1200" height="900" /> 1. कंप्रेसरची जोरदार 'धड-धड' आवाजजर फ्रिजमधून खूप मोठा 'धड-धड' किंवा असामान्य कंप येत असेल, तर हे गंभीर आहे. हा आवाज सहसा कंप्रेसरच्या बिघाडाचा (Compressor Fault) संकेत देतो. कंप्रेसरच्या आत एखादा भाग ढिला झाला असेल किंवा स्क्रू लूज झाले असतील.
संकेत: हा बिघाड लवकर दुरुस्त न केल्यास कंप्रेसर पूर्णपणे खराब होऊ शकतो आणि फ्रिज दुरुस्त करण्याऐवजी नवीन घेणे अधिक सोयीचे ठरू शकते. त्वरित मेकॅनिकला बोलवा.[/caption]
[caption id="attachment_1556768" align="alignnone" width="1200"]
पण, जर तुम्ही बर्फ वितळवूनही हीच समस्या वारंवार येत असेल, तर तुमच्या ऑटो-डीफ्रॉस्ट सिस्टीममध्ये बिघाड आहे, हे निश्चित समजा." width="1200" height="900" /> 2. खूप जास्त गुरगुरणारा आवाज
पण, जर तुम्ही बर्फ वितळवूनही हीच समस्या वारंवार येत असेल, तर तुमच्या ऑटो-डीफ्रॉस्ट सिस्टीममध्ये बिघाड आहे, हे निश्चित समजा." width="1200" height="900" /> 2. खूप जास्त गुरगुरणारा आवाजफ्रीजरमध्ये जास्त बर्फ जमा झाल्यास तो 'एव्हपोरेटर फॅन' (Evaporator Fan) ला अडथळा आणतो आणि त्यामुळे एक तीव्र गुरगुरणारा ऐकू येते. यासाठी तुम्ही फ्रिज बंद करून फ्रीजरचा दरवाजा 7-8 तास उघडा ठेवून बर्फ वितळवू शकता.
पण, जर तुम्ही बर्फ वितळवूनही हीच समस्या वारंवार येत असेल, तर तुमच्या ऑटो-डीफ्रॉस्ट सिस्टीममध्ये बिघाड आहे, हे निश्चित समजा.[/caption]
[caption id="attachment_1556765" align="alignnone" width="1200"]
उपाय: सर्वप्रथम कंडेनसर कॉइल्स स्वच्छ करा. तरीही फरक न पडल्यास, कंप्रेसर बदलणे किंवा नवीन फ्रिज घेणे हाच अंतिम पर्याय असतो. फ्रिजचे आवाज ओळखून वेळेवर त्याची काळजी घेणे, म्हणजे मोठी आर्थिक बचत करणे." width="1200" height="900" /> 3. तीव्र 'हमिंग' किंवा 'क्लिकिंग' आवाज
उपाय: सर्वप्रथम कंडेनसर कॉइल्स स्वच्छ करा. तरीही फरक न पडल्यास, कंप्रेसर बदलणे किंवा नवीन फ्रिज घेणे हाच अंतिम पर्याय असतो. फ्रिजचे आवाज ओळखून वेळेवर त्याची काळजी घेणे, म्हणजे मोठी आर्थिक बचत करणे." width="1200" height="900" /> 3. तीव्र 'हमिंग' किंवा 'क्लिकिंग' आवाजकंप्रेसरचा हलका हमिंग आवाज सामान्य असतो. पण जर हा आवाज खूप तीव्र झाला आणि फ्रिज पुरेशी थंडी देत नसेल, तर कंप्रेसर ओव्हरलोड होत आहे. 'क्लिक' आवाज येत असल्यास, कंप्रेसर गरम होऊन वारंवार बंद होत आहे, हे समजा.
उपाय: सर्वप्रथम कंडेनसर कॉइल्स स्वच्छ करा. तरीही फरक न पडल्यास, कंप्रेसर बदलणे किंवा नवीन फ्रिज घेणे हाच अंतिम पर्याय असतो. फ्रिजचे आवाज ओळखून वेळेवर त्याची काळजी घेणे, म्हणजे मोठी आर्थिक बचत करणे.[/caption]
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2025 10:32 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Fridge : तुमच्या फ्रिजमधून तर येत नाही ना असा आवाज? वेळीच सावध व्हा, नाहीतर स्वत:चं मोठं नुकसान करुन घ्याल










