WhatsApp वरील ही ब्लू रिंग काय काम करते? फायदे माहित पडले तर रोज कराल वापर

Last Updated:

आता जर तुम्ही व्हॉट्सॲप पाहिलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की, तिथे एक निळ्या रंगाचा एक गोल आहेत. पण तो कशासाठी वापरायचा किंवा तो काय काम करतो? हे अनेकांना माहित नाही.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : सोशल मीडियावर सध्या व्हॉट्सऍप सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग ऍप आहे. ऑफिसच्या कामापासून ते शाळेच्या अभ्यासापर्यंत आता सगळीच माहिती लोकांना या ॲपवर मिळते. भारताच नाही तर भारताबाहेर देखील हा ॲप वापरला जातो. कंपनी देखील आपल्या युजर्सचा एक्सपिरियन्स चांगल्या करण्यासाठी वेगवेगळ्या अपडेट्स आणत असतात, ज्याचा लोकांना फायदा देखील होतो.
आता जर तुम्ही व्हॉट्सॲप पाहिलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की, तिथे एक निळ्या रंगाचा एक गोल आहेत. पण तो कशासाठी वापरायचा किंवा तो काय काम करतो? हे अनेकांना माहित नाही.
खरंतर ही ब्लू रिंग एक AI फीचर आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने काम करते. इथे तुम्ही कोणताही प्रश्न विचारुन माहिती मिळवू शकता, तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फोटो तयार करुन देण्यासाठी देखील हे AI फीचर काम करते.
advertisement
जर तुम्हालाही या ब्लू रिंगबद्दल माहिती नसेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत, म्हणजे पुढच्यावेळी तुम्हाला ते नीट वापरता येईल.
व्हॉट्सॲपच्या या ब्लू रिंगचे नाव Meta AI आहे. हे एक वैशिष्ट्य आहे ज्याने चॅटिंगचा संपूर्ण मार्ग बदलला आहे. यामुळे युजर्सचे काम सोपे होते आणि ॲप वापरणेही मजेदार झाले आहे.
advertisement
ही एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI आधारित चॅटबॉट आहे जी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देते, माहिती पुरवते आणि तुमच्याशी संवादही साधते.
हे फीचर तुम्हाला व्हॉट्सॲपच्या होम स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात दिसेल. हे निळ्या रिंगसारखे दिसते. त्यावर क्लिक करताच चॅट सुरू होईल, जिथे तुम्ही AI ला आज्ञा देऊ शकता.
मेटाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही विषयाची माहिती मिळवू शकता. आपण नवीनतम चित्रपट आणि गाण्यांबद्दल जाणून घेऊ शकता. तुम्ही जवळच्या चांगल्या रेस्टॉरंट्स किंवा भेट देण्याच्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊ शकता. तुम्ही बोलून किंवा टाइप करून त्यावर बोलू शकता. तुम्ही तुम्हाला हवं असलेली इमेज किंवा फोटो तयार करुन घेऊ शकता.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp वरील ही ब्लू रिंग काय काम करते? फायदे माहित पडले तर रोज कराल वापर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement