advertisement

Jio चा मोठा धमाका! 5.5G झालं लॉन्च, आता मिळेल 1Gbps ची सुपरफास्ट इंटरनेट स्पीड

Last Updated:

Jio 5.5G सर्व्हिस सुरू झाली आहे. OnePlus 13 हा पहिला स्मार्टफोन आहे, जो Jio च्या प्रगत 5G सर्व्हिसला सपोर्ट करेल. हा फोन लॉन्च करताना, Jio च्या 5.5G म्हणजेच 5G अडव्हान्सड सर्व्हिसचा डेमो दाखवण्यात आला.

जिओ
जिओ
मुंबई : Jio ने 5.5G म्हणजेच 5G अडव्हान्सड सर्व्हिस सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम सव्हिस हे लेटेस्ट 5G टेक्नॉलॉजी 1Gbps च्या स्पीडने इंटरनेट प्रदान करेल. Jio च्या या नवीन 5.5G सेवेची एक झलक OnePlus 13 सीरीज लाँच करताना दिसली. OnePlus चा हा फोन Jio 5.5G किंवा Jio 5GA सेवेला सपोर्ट करणारा पहिला स्मार्टफोन आहे. हा फोन भारतात Jio च्या नेटवर्क टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. लॉन्च दरम्यान, कंपनीने दावा केला आहे की हा फोन भारतात 5.5G ला सपोर्ट करणारा पहिला डिवाइस आहे.
5G पेक्षा 5.5G किती वेगळे आहे?
5G च्या अडव्हान्सड व्हर्जनला 5.5G म्हणतात. जी 5G च्या तुलनेत उत्तम इंटरनेट स्पीड, कमी लेटेंसी आणि इंप्रूव्ड नेटवर्क रिलायबिलिटी ऑफर करते. ही टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड इंटेलिजन्स फीचरला सपोर्ट करते. सध्या, Jio ने 5.5G म्हणजेच 5G Advanced with Release 18 सुरू केले आहे, जो प्रारंभिक टप्पा आहे. पूर्वीच्या 15, 16 आणि 17 च्या रिलीझच्या तुलनेत ही सुधारणा आहे. त्याच वेळी, हे प्रगत 5G टेक्नॉलॉजी रिलीज 21 पर्यंत विकसित होईल, जे 2028 पर्यंत लॉन्च केले जाऊ शकते.
advertisement
Jio ने 2022 मध्ये True 5G सेवा सुरू केली. ज्याला Stand Alone म्हणजेच SA 5G सेवा म्हणतात. त्याच वेळी, एअरटेलने NSA म्हणजेच नॉन-स्टँड अलोन 5G सेवा सुरू केली होती. तसंच, Airtel नंतर SA 5G आणि Advanced 5G सर्व्हिस सुरू करेल. NSA मध्ये, 5G सेवा फक्त विद्यमान 4G पायाभूत सुविधांवर प्रदान केली जाते. NSA ची रेंज अधिक आहे, परंतु वेगाच्या बाबतीत SA अधिक चांगले मानले जाते. 5.5G मध्ये मल्टी कॅरियर एग्रिगेशन इनेबल केले जाऊ शकते, जेणेकरून यूझर्सना अखंड कनेक्टिव्हिटी मिळू शकेल.
advertisement
Jio 5.5G मध्ये 1Gbps स्पीड
OnePlus 13 लाँच करताना, 5.5G सेवेचा डेमो व्हिडिओ दाखवण्यात आला होता. ज्यामध्ये डाउनलिंग स्पीड 277.78 Mbps होता आणि नॉन-कम्पोनंट कॅरियर्स (नॉन-3CC) मध्ये, Jio च्या नेटवर्कवर 1014.96 Mbps चा डाउनलिंग स्पीड दिसला होता. Jio च्या वेबसाइटनुसार, भारतातील Jio True 5G यूझर्सना 1Gbps च्या स्पीडने इंटरनेट मिळेल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio चा मोठा धमाका! 5.5G झालं लॉन्च, आता मिळेल 1Gbps ची सुपरफास्ट इंटरनेट स्पीड
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement