5G, 4G+ आणि LTE या पैकी तुम्ही कोणतं नेटवर्क वापरता? तुम्हाला माहितीय का यातला फरक?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
म्हाला हायस्पीड इंटरनेटसाठी LTE (4G), 4G+ आणि 5G तुमच्या फोनमध्ये जो पर्याय असेल तो निवडावा लागतो. पण कधी विचार केलाय का हे तिन्ही एकच आहेत की वेगवेगळे, काय फरक असतो?
5G चा जमाना आहे. ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी 4G नेटवर्क वापरलं जात आहे. मात्र आता सगळ्या नव्या फोनमध्ये 5G सपोर्ट येत आहे, असं असलं तुम्ही नीट पाहिलं तर प्रत्येक फोनचं सेटिंग वेगवेगळं आहे. काही फोनमध्ये 5G/4G असा पर्याय असतो. काही फोनमध्ये 4G+ किंवा काही फोनमध्ये LTE असा पर्याय दिलेला असतो. बाकी 3G, 4G पर्याय असतात, यापैकी तुम्हाला हायस्पीड इंटरनेटसाठी LTE (4G), 4G+ आणि 5G तुमच्या फोनमध्ये जो पर्याय असेल तो निवडावा लागतो. पण कधी विचार केलाय का हे तिन्ही एकच आहेत की वेगवेगळे, काय फरक असतो?
तुमचा समज असेल की LTE (4G), 4G+ आणि 5G ह्या तिन्ही सेटिंगचा अर्थ एक आहे तर तसं नाही. तिन्हीचे अर्थ वेगवेगळे आहेत. जे तुम्हाला माहिती असायला हवेत. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञानाने आपल्या जीवनशैलीत मोठे बदल घडवले आहेत. इंटरनेटचा वेग, कॉलची गुणवत्ता आणि डेटा वापराचा अनुभव यावर हे नेटवर्क प्रकार थेट परिणाम करतात. सध्या बाजारात प्रचलित असलेले LTE (4G), 4G+ आणि 5G हे तीन प्रमुख मोबाईल नेटवर्क प्रकार आहेत. यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.
advertisement
LTE म्हणजे काय?
LTE (Long Term Evolution) ही तंत्रज्ञानाची चौथी पिढी असून ती 3G पेक्षा अनेक पटीने वेगवान आहे. यामध्ये OFDMA व MIMO यासारख्या सुधारित प्रणालींचा वापर केला जातो, ज्यामुळे डाउनलोड स्पीड साधारणतः 100 Mbps पर्यंत पोहोचू शकतो. बहुतांश ग्रामीण व उपनगरी भागात अजूनही LTE वापरात आहे.
4G+ म्हणजे काय?
advertisement
4G+ किंवा LTE-Advanced ही LTE ची सुधारित आवृत्ती आहे. यात Carrier Aggregation चा वापर केला जातो, म्हणजे एकाच वेळी अनेक फ्रिक्वेन्सी बँड एकत्र करून अधिक डेटा स्पीड मिळतो. 4G+ चा स्पीड 300 Mbps पर्यंत जाऊ शकतो आणि ही सेवा मुख्यतः शहरी भागात उपलब्ध असते.
5G – वेगवान युगाची सुरुवात
5G ही मोबाईल नेटवर्कची पाचवी पिढी असून, तिची गती LTE आणि 4G+ च्या तुलनेत अनेक पटीने जास्त आहे. याचा कमाल डाउनलोड स्पीड 10 Gbps पर्यंत जाऊ शकतो. यामध्ये लेटंसी फारच कमी (फक्त 1 मिलीसेकंद) असल्यामुळे IoT डिव्हाईस, स्मार्ट सिटी, आणि ऑगमेंटेड रिअॅलिटीसारख्या प्रगत तंत्रज्ञानासाठी ही आदर्श प्रणाली मानली जाते.
advertisement
आता तुम्ही नवा फोन घेत असाल तर या बॅण्डविथचा विचार करुन फोन घ्या. तुमच्याकडे फोन असेल तर तुमच्या फोनमध्ये यापैकी कोणते सेटिंग आहे ते चेक करा आणि स्मार्ट बना. त्यानुसार नेटवर्कसाठी सेटिंग करा आणि हायस्पीड डेटासाठी पर्याय निवडा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 09, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
5G, 4G+ आणि LTE या पैकी तुम्ही कोणतं नेटवर्क वापरता? तुम्हाला माहितीय का यातला फरक?


