YouTube कडून कमाईची नवी संधी! 'या' फीचरमुळे होणार जबरदस्त कमाई, कसं करतं काम, लगेच समजून घ्या

Last Updated:

लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे प्रेक्षकांशी थेट संवाद साधता येतो आणि याच मार्गातून पैसेही कमवता येतात. आता यूट्यूबने आपल्या यूजर्ससाठी आणखी एक नवं फीचर आणलं आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या काळात सोशल मीडिया हा फक्त मनोरंजनाचा मार्ग राहिला नाही, तर कमाईचं एक मोठं साधन बनला आहे. लाखो लोक आपली कला, ज्ञान किंवा टॅलेंट जगासमोर मांडून उत्पन्न कमावत आहेत. विशेषत: लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे प्रेक्षकांशी थेट संवाद साधता येतो आणि याच मार्गातून पैसेही कमवता येतात. आता यूट्यूबने आपल्या यूजर्ससाठी आणखी एक नवं फीचर आणलं आहे, ज्याचं नाव आहे Gift Goals.
हे फीचर सध्या टेस्टिंगमध्ये आहे, पण लवकरच ते अधिक पात्र क्रिएटर्सना उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यामध्ये प्रेक्षक थेट लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान आपल्या आवडत्या क्रिएटर्सना गिफ्ट्स पाठवू शकतील. त्याचबरोबर हे फीचर क्रिएटरला आपल्या चाहत्यांशी अजून जास्त जोडण्यास मदत करणार आहे.
फीचर कसं काम करेल?
लाईव्ह स्ट्रीमिंग करताना क्रिएटर्स कमाईसाठी गोल सेट करू शकतात. प्रेक्षकांनी पाठवलेले गिफ्ट्स Jewels च्या स्वरूपात खरेदी करावे लागतील, ज्यांची किंमत 0.99 डॉलर्स ते 49.99 डॉलर्सपर्यंत असेल.
advertisement
प्रेक्षकांना तयार केलेले एनिमेटेड गिफ्ट्स मिळतील, मात्र त्यात बदल करता येणार नाही. गिफ्ट्स नंतर Rubies मध्ये कन्वर्ट होतील, जिथे 1 Ruby = 1 सेंट असेल. म्हणजे 100 Rubies = 1 डॉलर.
काही महत्त्वाच्या अटी
गिफ्ट्स रिडीम करण्यासाठी क्रिएटर्सनी व्हर्टिकल फॉरमॅटमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करणे आवश्यक आहे. हे फीचर वापरण्यासाठी YouTube Studio मधील Earn टॅबवर क्लिक करता येईल.
advertisement
या फीचरसोबत यूट्यूबने सुपर स्टिकर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता गिफ्ट्स इनेबल केल्यावर सुपर स्टिकर्सचा वापर करता येणार नाही. विशेष ऑफर म्हणून जर एखाद्या क्रिएटरने पहिल्या तीन महिन्यांत 1,000 डॉलर्सची कमाई केली, तर त्याला यूट्यूबकडून 50% बोनस दिला जाणार आहे.
यूट्यूबने 2024 च्या नोव्हेंबरमध्ये या गिफ्ट फीचरची घोषणा केली होती आणि आता 2025 मध्ये ते निवडक आणि पात्र क्रिएटर्ससाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून कमाईसाठी हा एक नवा आणि मोठा मार्ग उघडणार आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
YouTube कडून कमाईची नवी संधी! 'या' फीचरमुळे होणार जबरदस्त कमाई, कसं करतं काम, लगेच समजून घ्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement